नागपूर : कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर पती वारंवार चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. कुणाशीतरी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून पत्नीला मारहाण केल्यानंतर तिला विष पाजून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना काटोलमध्ये घडली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे. आरोपी जितेंद्र सिद्धार्थ तायडे (३१, नरखेड) हा ऑटोचालक असून त्याचे गावातील युवती प्रगती (२७) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, परंतु कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्यामुळे दोघेही गाव सोडून काटोलला राहायला आले. जितेंद्र हा शहरात ऑटो चालवित होता. प्रगती एकटी घरी राहत होती. त्यामुळे ती फोनवर सतत नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणीशी बोलत राहायची. त्यामुळे जितेंद्रला तिच्या चारित्र्यावर संशय आला. त्यामुळे त्याने तिला फोनवर बोलण्यावरून अनेकदा टोकले. त्याने तिचा मोबाईल फोन स्वत:कडे ठेवून घेतला.

हेही वाचा : नागपूर: पोटात गोळी शिरल्यावरही युवकाने पिस्तुल हिसकावली

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur youth attempt to kill his wife after love marriage due to suspicion of character adk 83 css
First published on: 04-04-2024 at 23:58 IST