scorecardresearch

लोकसत्ता लोकांकिका’: तरुणाईच्या जल्लोषात स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात

सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या संहिता हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

लोकसत्ता लोकांकिका’: तरुणाईच्या जल्लोषात स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

नागपूर: ‘सेट तयार झाला का,? अमूक कुठे आहे?, अशा प्रश्नांची विचारणा, त्या अनुषंगाने सुरू असलेली लगबग, उत्साह आणि धाकधूकही, परीक्षक आणि स्पर्धेबद्दलची उत्सुकता, जिंकण्याची ईर्षा पण तितकाच खिलाडूपणा आणि प्रतिस्पर्धी संघालाही मदत करण्याची तयारी… अशा वातावरणात, तरुणाईच्या जल्लोषात सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व ‘झी युवा’ आणि ‘टुगेदरिंग’ च्या सहकार्याने  ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरूवात शुक्रवारी नागपुरातून झाली. विषयांतील वैविध्य आणि आविष्कारातील नाविन्य हे या स्पर्धेचे अनोखे वैशिष्ट्य ठरले.

फेरीच्या पहिल्या दिवशी चार एकांकिका मोठ्या उत्साहात सादर करण्यात आल्या. सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या संहिता हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. ‘ शेतकऱ्याची आत्मकथा’ या नाटकाने शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले तर दोन भावांमधील वाद, दुभंग व्यक्तिमत्त्व यासारख्या विषयांची मांडणी एकांकिकांमधून करण्यात आली. यावेळी तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या मित्रांच्या एकांकिका पाहायला आले होते. यावेळी तरुणाईच्या टाळ्या, हिप हिप हुर्रे… अशा जल्लोषात सभागृह दुमदुमले होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 17:52 IST

संबंधित बातम्या