नागपूर : शहरातील तरूण टेबलटेनिसपटू जेनिफर वर्गीसने आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत अंडर-१७ आणि अंडर-१९ वयोगटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. टयुनिशिया येथे झालेल्या टेबलटेनिस स्पर्धेच्या अंडर-१७ गटात उपांत्यफेरीत जेनिफरला रौमहर्षक लढतीत हाँगकाँगच्या सु तुंग हिने हरविले. उपांत्यफेरीतील पराभवामुळे जेनिफरला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

दुसरीकडे, अंडर-१९ वयोगटात देखील हॉंगकॉंगच्या वॉंग हॉंग तुंग हिने १-३ च्या अंतराने जेनिफरचा पराभव केला. त्यामुळे यामध्ये जेनिफरला रौप्य पदक प्राप्त झाले. यापूर्वी अंडर-१७ गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत जेनिफरने भारताच्या सुहाना सैनी हिचा ३-१ ने पराभव करत उपांत्यफेरी गाठली होती. उपांत्यपूर्व पूर्व (प्री-क्वार्टरफायनल) फेरीत जेनिफरने कोरियाच्या चोई सियोईन हिचा ३-१ ने पराभव केला होता.

हेही वाचा…नागपूर: भाजयुमोच्या नमो संमेलनाविरोधात आंदोलन; पोलिसांकडून लाठीमार, अनेकांना अटक

दुसरीकडे ट्युनिशियामध्ये झालेल्या अंडर-१९ गटात उपांत्यफेरी गाठण्यासाठी जेनिफरला संघर्ष करावा लागला होता. जर्मनीच्या लिसा वांग हिच्यासोबच्या उपांत्यपूर्व पूर्व फेरीच्या रोमहर्षक सामन्यात ३-२ ने जेनिफरने विजय प्राप्त केला. यानंतर उपांत्यफेरीत सिंगापूरच्या चिआांग जेनिली हिचा पराभव करत जेनिफरने रौप्य पदक पक्का केला. जेनिफरचा उपांत्यफेरीत पराभव झाला असला तरी रौप्य पदक प्राप्त केल्यामुळे शहरातील क्रीडाप्रेमींनी तिचे कौतुक केले आहे.