Rohit Sharma Virat Kohli T20I Retirement: भारतीय संघाने १७ वर्षांनंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली आणि विराट कोहली रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्यासह टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. पण भारताच्या या विजयावर आणि रोहित शर्मा, विराट कोहलीवर माजी खेळाडू मायकल वॉन यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. वॉनच्या मते, हे दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीत फार ट्रॉफी जिंकू शकले नाहीत.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

विराट कोहली आणि रोहित शर्मा गेली अनेक वर्ष भारतीय संघासाठी सातत्याने क्रिकेट खेळताना दिसत आहेत. हे दोघेही भारताचे दिग्गज खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे विक्रमही त्यांनी आपल्या नावे केले आहेत. रोहित आणि विराट यंदाच्या टी-२० विश्वचषकात सलामीसाठी उतरले होते. विराटची बॅट संपूर्ण टूर्नामेंटमध्ये शांत होती. पण संघाला जेव्हा गरज होती, तेव्हा अंतिम सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली तर रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहलीला त्याच्या महत्त्वपूर्ण खेळीसाठी अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर विराटने संवाद साधताच टी-२० मधून निवृत्ती जाहीर करत असल्याचे म्हटले. तर रोहित शर्माने अंतिम सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत टी-२० क्रिकेटला अलविदा करत असल्याचे सांगितले.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० विश्वचषक २०२४ नंतर या फॉरमॅटला अलविदा केले. वॉनने सोमवारी क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर त्यांच्या या निवृत्तीचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. वॉव म्हणाला, “तेही मान्य करतील की वर्ल्डकप विजयानंतर निवृत्ती घेण्याची योग्य वेळ होती. परंतु त्यांनी अधिक व्हाईट बॉल ट्रॉफी जिंकायला हव्या होत्या. जरा कल्पना करा, रोहितला दुसरा टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी १७ वर्षे लागली. मला वाटतं की त्याला स्वतःला वाटेल की त्याने आणखी १-२ ट्रॉफी जिंकायला हव्या होत्या.”

हेही वाचा – रोहित शर्माची बायको कुणाला म्हणते ‘वर्क वाईफ’? हिटमॅनने खास पोस्टमध्ये केला मोठा खुलासा

मायकेल वॉन पुढे म्हणाले की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तर पुढे तो म्हणाला, ‘बार्बाडोसमध्ये जिंकून आणि ट्रॉफी हातात घेऊन निवृत्त होण्याचा अनुभव नक्कीच चांगला असेल. रोहित आणि विराट यांनी आता आरामात बसून कसोटी, वनडे आणि एमएस धोनीसारखे आयपीएलमध्ये खेळू शकतात आणि ते वर्षानुवर्षे खेळत राहतील. भारतीय क्रिकेट संघात त्यांची जागा नक्कीच कारण भारतीय संघाकडे प्रतिभावान खेळाडूंची कमी नाहीय.”

हेही वाचा – VIDEO: विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला पाहिलात का? कोट्यवधींच्या वास्तूत आहेत या गोष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी मायकेल वॉनने आयसीसीवर भारताबाबत पक्षपाती असल्याचा आरोप केला होता. टीम इंडियाच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार केल्याचे त्यांनी म्हटले होते. टीम इंडियामुळे इतर संघांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, या वक्तव्यासाठी भारतीय दिग्गजांकडून वॉन यांची चांगलीच शाळा घेतली गेली. रवी शास्त्रींपासून ते हरभजन सिंगपर्यंत सर्वांनीच त्यांना सुनावले होते.