नागपूर : अमरावतीमध्ये फळ व्यावसायिक असलेल्या तरुणाचे नागपुरातील तरुणीशी लग्न जुळले. सहा महिन्यापूर्वी दोघांचाही मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा झाला. त्यानंतर तो वारंवार नागपुरात येऊन तिला बळजबरी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता. शेवटी ही बाब तिने कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर तक्रारीवरून भावी पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिरोज खान नियामत खान (२१ हैदरपुरा, गड्डे, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. २३ वर्षीय तरुणीसोबत फिरोज खानचे सहा महिन्यांपूर्वी साक्षगंध झाले. त्यानंतर तिच्याशी तो मोबाईलवर बोलत होता. यादरम्यान, तो तिला नेहमी व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडत होता. तसेच तो तिला भेटायला नागपुरात येत होता. तो सतत तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत करीत होता. मात्र, तिने  नकार दिला.

हेही वाचा >>> खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…

Saneshkhali rape case
संदेशखाली प्रकरणात यु टर्न; टीएमसी नेत्यावरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपावर आरोप करत पीडित महिला म्हणाल्या, “आम्हाला कोऱ्या कागदावर…’
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Radhika Khera congress
“रात्री नशेत असताना ते…”, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप करत राधिका खेरांचा राजीनामा
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Prajwal Revanna Rape Victime
“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”

गेल्या काही दिवसांपूर्वी तो नागपुरात आला. यावेळी तरुणीच्या घरी कुणीही नव्हते.  फिरोजने शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच लग्न मोडण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणी घाबरली.  त्याने होणाऱ्या पत्नीवर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर तो वारंवार संबंधाची मागणी करायला लागला. १७ एप्रिलला तो पुन्हा घरी आला. त्याने शारीरिक संबंध केल्यानंतर निघून गेला. २० एप्रिलला त्याने पुन्हा फोन करून नागपुरात येत असल्याचे सांगून शारीरिक संबंधाची मागणी केली.  तरुणीने ही बाब आईला सांगितली. आईने कुटुंबीयांशी चर्चा केली. कुटुंबीयांनी तरुणीला धीर देऊन पोलीस ठाण्यात नेले. तरुणीच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी भावी पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. लवकरच फिरोजला अटक करण्यात येणार आहे.