Premium

विनयभंग प्रकरणात नवे वळण, विद्यार्थिनींचे पालक म्हणतात ‘ते’ निर्दोष…

एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील शासकीय आश्रमशाळेत सहावीतील सहा विद्यार्थिनींची अध्यापनादरम्यान शिक्षकाने छेड काढल्याचे प्रकरण उजेडात आले होते.

new twist in the molestation case
पालकांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्याध्यापिका व अधीक्षिकांवर आरोप करत शिक्षकास खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा दावा केला.(फोटो- प्रातिनिधिक)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील शासकीय आश्रमशाळेत सहावीतील सहा विद्यार्थिनींची अध्यापनादरम्यान शिक्षकाने छेड काढल्याचे प्रकरण उजेडात आले होते. शिक्षक सध्या अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, पालकांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्याध्यापिका व अधीक्षिकांवर आरोप करत शिक्षकास खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा दावा केला. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.

एटापल्ली येथील सा.बां. विभागाच्या विश्रामगृहात पीडित मुलींच्या पालकांसह आदिवासी विद्यार्थी संघाचे प्रज्वल नागुलवार यांच्या उपस्थितीत शाळा समिती पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुलींसोबत शिक्षक प्रदीप तावडे यांनी कुठलाही गैरप्रकार केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

आणखी वाचा-बनावट ऑनलाइन गेमिंग ऍप : सोंटू जैनच्या जामिनावर २६ सप्टेंबरला निर्णय

एका मुलीला गणिताचा अभ्यास न केल्याने त्यांनी खडसावले होते. मात्र, अधीक्षिका व मुख्याध्यापिका यांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, पत्रपरिषदेनंतर पोलिस अधीक्षकांना निवेदन पाठवून या प्रकरणात नि:पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी केली.

१८ सप्टेंबरला हालेवारा येथे प्रभारी प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण समिती व पालकांची संयुक्त सभा घेण्यात आली. यावेळी मोठ्या पालकांनी मख्याधापिका, व अधिक्षीका यांना चागलेच धारेवर धरले. त्यांच्या कामकाजाबद्दल रोष व्यक्त करत तुमची काही जबाबदारी नाही का, असा प्रश्न केला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New twist in the molestation case student parents claim that teacher was falsely accused ssp 89 mrj

First published on: 22-09-2023 at 13:57 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा