नागपूर : ‘मेरे घर के ऊपर से वायर जा रही, कृपया उसे हटाये …’ या ओळी वाचत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले आणि ही कसली जनहित याचिका म्हणत नाराजी व्यक्त केली.

स्वतःच्या घरापुढील वीज खांब हटविणे हा वैयक्तिक विषय असून त्याकरिता जनहित याचिका दाखल केली जाऊ शकत नाही, असेही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले. मानकापूर येथील मो. उमर खान यांनी स्वतःच्या घरापुढील वीज खांब हटविण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. हा खांब परिसरातील रहिवाशांसाठी धोकादायक आहे. खांब हटविण्यासाठी महानगरपालिकेला तक्रार केली होती, पण दखल घेण्यात आली नाही, असे त्यांचे म्हणणे होते.

High court Denied Bail to Actor Sahil Khan, Mahadev Betting App Case, sahil khan denied bell in betting app case, Mahadev betting app, sahil khan, Mumbai high court, marathi news, Mahadev betting app news, marathi news, Mumbai news,
महादेव बेटिंग ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खानला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
EX Jharkhand CM Hemant Soren Moves sc for bail
हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकेविरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा आरोप 
Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता

हेही वाचा – जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा, शहा यांनी शिंदे-पवारांना बजावले !

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

हेही वाचा – प्रा. साईबाबा यांच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्या. अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हा जनहित याचिकेचा विषय होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले व याचिकाकर्त्याला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्याची मुभा देऊन याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.