खासगी रुग्णालयांकडून सर्वसामान्यांची लूट सुरूच

नागपूर : सुरुवातीला खाटा शिल्लक नाही म्हणून करोनाबाधिताला परत पाठवणाऱ्या शंकरनगरमधील एका बडय़ा रुग्णालयाने रुग्णांच्या नातेवाईकाने जादा पैसे भरण्याची तयारी दर्शवताच रुग्णाला दाखल करून घेतल्याची  माहिती  हाती आली आहे.

एकीकडे महापालिका खासगी रुग्णालयात ८० टक्के खाटा कोविड  रुग्णांसाठी राखीव असल्याचा दावा करीत आहे तर दुसरीकडे या रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. श्रीमंतांनाच येथे दाखल के ले जाते, असा आरोपही के ला जात आहे. त्याला बळ देणारी घटना चार दिवसांपूर्वी शहरातील एका बडय़ा रुग्णालयात घडली. करोना उपचारासाठी या रुग्णालयात गेला  होता. त्याच्याकडे रोखरहित उपचारासाठी विमा कं पनीचे कार्ड होते. मात्र या कार्डवर उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचारापूर्वीच रोख रक्कम भरण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर त्याला दाखल करून घेण्यात आले. शहरातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याने याबाबत त्याला आलेला अनुभव सांगितला.

असाच प्रकार धंतोलीतील एका रुग्णालयाच्या बाबतीतही घडला. तेथे सुरुवातीला रुग्णाला परत पाठवण्यात आले. रुग्णाच्या नातेवाईकांनी एका माजी नगरसेवकाकडे धाव घेतली. त्यानेही रुग्णालयाला विनंती के ली. अतिदक्षता विभागात खाटा शिल्लक नाही, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र संबंधित नगरसेवकांने याबाबत आपण सरकारकडे तक्रार करू, असे  सांगताच रुग्णाचे कागदपत्र पाठवण्यास सांगितले. त्यानंतर त्याला दाखल करून घेण्यात आले. एका सरकारी अधिकाऱ्याने त्याचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, शहरात सरकारी आणि खासगी रुग्णालयात खाटांचा तुटवडा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला आहे. अनेक बडय़ा रुग्णालयात व्हीआयपींच्या नावाखाली खाटा राखीव ठेवल्या जात आहे. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे खासगी रुग्णालयांनी खरच ८० टक्के  खाटा उपलब्ध दिल्या आहेत काय याची तपासणी  करणारी  यंत्रणा नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना खाटा मिळत नाही. दरम्यान, महापालिके च्या हेल्पलाईनचे क्रमांक लागत नाही.

सतत व्यस्त असतात. लागल्यावरही पुरेशी माहिती दिली जात नाही. कु ठल्या रुग्णालयात खाटा आहे हे सांगितले  जात नाही. रुग्णालयाचे नाव सांगून चौकशी करा, असे सांगितले जाते, असा अनुभव अनेकांना आला आहे.