scorecardresearch

वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची बदली ; राहुल कर्डीले नवे जिल्हाधिकारी

कर्डीले यांनी यापूर्वी विदर्भात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहलेले आहे.

वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची बदली ; राहुल कर्डीले नवे जिल्हाधिकारी
राहुल कर्डीले

वर्धा:लोकप्रतिनिधी सोबत विसंवाद झाल्याने चर्चेत आलेल्या वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची अखेर बदली झाली असून नवे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डीले यांची नियुक्ती करण्यात आली आहे

कर्डीले यांनी यापूर्वी विदर्भात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहलेले आहे. देशभ्रतार यांच्या बदलीमागे विविध कारणे दिली जातात. पण प्रामुख्याने भाजपच्या लोकप्रतिनिधी सोबत त्यांचे अनेकदा खटके उडाल्याचे सांगितल्या जाते.

जिल्ह्यातील भाजपचे खासदार रामदास तडस तसेच आमदार डॉ पंकज भोयर, दादाराव केचे व समीर कुणावार यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडे देशभ्रतार यांच्या कार्यपद्धती बाबत नाराजी नोंदविली होती,अशी चर्चा आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.