scorecardresearch

Premium

Rajya Sabha Election: बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा; म्हणाले “मोदींशी बोलून तोडगा काढा, अन्यथा शेवटच्या पाच मिनिटांत…”

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारलाच आता कोंडीत पकडले असून धान आणि हरभऱ्याच्या खरेदी प्रश्‍नावर आक्रमक झाले आहेत

Rajya Sabha Election, Prahar Sanghatna, Bachchu Kadu, Maharashtra CM Uddhav Thackeray
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारलाच आता कोंडीत पकडले आहे

मोहन अटाळकर

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला धान आणि हरभरा खरेदीच्या प्रश्‍नावर कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून या विषयावर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीत मतदानाबाबत शेवटच्या पाच मिनिटांमध्ये निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.

Uddhav thackeray on nanded case
नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “खेकड्यांच्या हातात…”
Aditya-Thackeray-Uday-Samnat
“हा आहे माझ्या लंडन दौऱ्याचा खर्च, आता…”, उदय सामंत यांच्याकडून हिशोब मांडत विरोधकांना उत्तर
devendra fadnavis eknath shinde
“२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”, भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर शिंदे गटातील नेते म्हणाले…
What Aditya Thackeray Said?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ व्हिडीओवर आदित्य ठाकरेंची टीका, “दीड वर्ष महाराष्ट्र गद्दार गँगच्या भूलथापा…”

१० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना सध्या मतांची जुळवाजुळव करत आहे. या पार्श्वभूमीवर कडू यांनी दिलेला इशारा महत्त्वपूर्ण ठरतो.

बच्चू कडू म्हणाले की, “आमचे मतदान भाजपला जाणार नाही. मात्र, महाविकास आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू. संपूर्ण महाराष्ट्रात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख तर धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख आहे. केंद्र सरकार शेतमाल खरेदी करीत नाही. त्यामुळे त्यांनी एका हेक्टरला हजार रुपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात”.

सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहे. तसेच आघाडी सरकारमधील मित्रपक्षांची मते फुटणार नाही. यासाठी देखील ठाकरे सरकार काळजी घेत आहे. त्यात आता ऐनवेळी बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajya sabha election prahar sanghatna bachchu kadu maharashtra cm uddhav thackeray sgy

First published on: 06-06-2022 at 18:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×