लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीत वाहतूक नियम मोडण्याची ऑटोरिक्षा चालकांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या चार वर्षांची स्थिती बघता प्रत्येक वर्षी शहरात नियम मोडणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या वाढत असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर हे गृह शहर आहे.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?

उपराजधानीत २०२० या वर्षात २७ हजार ६३१ ऑटोरिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम मोडले. या सगळ्या ऑटोरिक्षा चालकांकडून नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी ६९ लाख ४३ हजार ५० रुपये दंड वसूल केला. २०२१ मध्ये शहरात २७ हजार १७५ ऑटोरिक्षा चालकांनी वाहतूक नियम तोडले. त्यांच्याकडून ६६ लाख ७५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. वर्ष २०२२ मध्ये १७ हजार ८० ऑटोरिक्षा चालकांनी नियम मोडल्याने त्यांच्याकडून ९३ लाख ६५ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. १ जानेवारी २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत केवळ १० महिन्यात शहरात २६ हजार २४८ ऑटोरिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम मोडल्याने त्यांच्याकडून १ कोटी ३८ लाख १ हजार ६०० रुपये दंड वसूल केला गेल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले. त्यामुळे शहरात नियम धाब्यावर बसवणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांवर पोलिसांचा वचक आहे काय? हा प्रश्न विविध संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा-१४ वर्षांची मुलगी २८ आठवड्यांची गर्भवती, उच्च न्यायालय म्हणाले…

लाचखोरीमुळे स्थिती उद्भवली

संघटनेने आरटीओ आणि नागपूर शहर वाहतूक पोलिसांना वारंवार निवेदन देत शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी सगळे ऑटोरिक्षा मीटरने चालायला तयार असल्याचेही कळवले गेले. परंतु, या विभागांतील लाचखोरीमुळे प्रामाणिक ऑटोरिक्षा चालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होते. संघटनेची मागणी मान्य झाल्यास ऑटोरिक्षा चालकांकडून नियम मोडले जाणार नाही. -विलास भालेकर, अध्यक्ष, विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन.

शहरातील कारवाई झालेल्या ऑटोरिक्षांची स्थिती

वर्ष ऑटोरिक्षा दंड
२०२०२७,६३१ ६९,४३,०५०
२०२१२७,१७५६६,७५,५००
२०२२१७,०८० ९३,६५,६००
२०२३ (३१ ऑक्टो.)२६,२४८१,३८,०१,६००