scorecardresearch

Premium

Video : भानूसखिंडी व बछड्याला पाहून रानगवा थबकला, नजरानजर झाली अन्… ताडोबात पर्यटकांनी अनुभवला थरार…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांचे हमखास दर्शन. येथून पर्यटक व्याघ्रदर्शनाशिवाय परत गेला असे क्वचितच घडते.

Tadoba Tiger Project captures the charm of tigers and their cubs on camera
भानूसखिंडी व बछड्याला पाहून रानगवा थबकला, नजरानजर झाली अन्… ताडोबात पर्यटकांनी अनुभवला थरार…

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांचे हमखास दर्शन. येथून पर्यटक व्याघ्रदर्शनाशिवाय परत गेला असे क्वचितच घडते. आतापर्यंत या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातच व्याघ्रदर्शनाने वन्यजीवप्रेमी सुखावत होते. मात्र, आता बफर क्षेत्रातील वाघांनी वन्यजीवप्रेमींना लळा लावला आहे. त्यातही निमढेला प्रवेशद्वारावर भानूसखिंडी आणि तिचे बछडे, छोटा मटका या वाघांच्या करामतींनी वन्यजीवप्रेमींची गर्दी आता इकडे वळू लागली आहे. वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी कित्येकदा वाघ आणि त्यांच्या बछड्यांच्या नानाविध करामती त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत.

जगभरातील पर्यटक ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात येतात. प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांनाही याच व्याघ्रप्रकल्पात भ्रमंती करायची असते आणि विशेष म्हणजे ताडोबातील वाघही त्यांना निराश करत नाहीत. दोन वाघांमधील युद्ध असो, वाघांच्या बछड्यांचे जंगलात हुंदडणे असो वा आणखी करामती. वन्यजीवप्रेमींना त्या कॅमेऱ्यात कैद करण्यात यश आले आहे.  याच ताडोबातील निमढेला बफर क्षेत्रात सध्या भानूसखिंडी आणि तिच्या बछड्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ही वाघीण आणि तिच्या बछड्यांचा असाच एक क्षण वन्यजीवप्रेमी इंद्रजित मडावी यांनी टिपला. वाघीण तिच्या बछड्यांना शिकार शिकवते आणि दोन वर्षाचे झाल्यानंतर हे बछडे स्वत:च शिकार करु लागतात. निमझेला बफर क्षेत्रात रानगव्याशी त्यांचा सामना झाला. वाघीण आणि तिच्या बछड्याला पाहताच रानगवा थबकला. दोघांचीही नजरानजर झाली. तो जीव वाचवण्यासाठी मार्ग शोधत होता, तर भानूसखिंडी व तिचा बछडा तो रानगवा त्यांच्या तावडीत कसा सापडेल, यासाठी तयारीत होते आणि एकाक्षणी रानगव्याच्या दिशेने धाव घेतली तर त्याचक्षणी त्याने तिथून धुम ठोकली. हा थरार वन्यजीवप्रेमींनी निमढेलात अनुभवला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tadoba tiger project captures the charm of tigers and their cubs on camera rgc76 amy

First published on: 06-12-2023 at 17:22 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×