scorecardresearch

Premium

वर्धा : चक्क पतीच निघाला दुचाकी चोर, होता भलताच डाव…

स्थानिक स्वागत कॉलनीत राहणाऱ्या दुर्गा रवींद्र पांडे या पतीसह बाजार व देवदर्शनासाठी दुचाकीने घराबाहेर पडल्या. घरी परतल्यावर काही वेळाने त्यांना गाडी दिसून आली नाही.

husband thief wardha
वर्धा : चक्क पतीच निघाला दुचाकी चोर, होता भलताच डाव… (प्रातिनिधिक छायाचित्र)

वर्धा : स्थानिक स्वागत कॉलनीत राहणाऱ्या दुर्गा रवींद्र पांडे या पतीसह बाजार व देवदर्शनासाठी दुचाकीने घराबाहेर पडल्या. घरी परतल्यावर काही वेळाने त्यांना गाडी दिसून आली नाही. लगेच त्यांनी सेवाग्राम पोलिसांना गाडी चोरी गेल्याची तक्रार दिली.

हेही वाचा – गडचिरोली : ‘एमआयडीसी’साठी जमीन देण्यास नकार, अधिग्रहणावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष

man and his son stabbed young man for a trivial reason
नागपुरात २१ दिवसांत १५ हत्याकांड! क्षुल्लक कारणावरून बापलेकाने युवकाला भोसकले
Ajit Pawar and rohit pawar
अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडलं जातंय का?, रोहित पवार म्हणाले, “साहेबांनी बांधलेल्या घरातून…”
Farmers protest
शंभू सीमेवर धडकलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीच्या वेशीवर तणाव
washim tyres came off truck hit bystanders killed injured medshi
वाशिम : धावत्या ट्रकचे टायर निखळले अन् रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्यांना धडकले; एकाचा मृत्यू, एक जखमी

हेही वाचा – भंडारा : नर्सिंग महाविद्यालयातील ४७ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, काहींची प्रकृती गंभीर

तपास सुरू केल्यावर ही गाडी येथील वडार झोपडपट्टीत राहणाऱ्या दशरथ कुराडे याने चोरल्याची माहिती मिळाली. त्याला हिसका बसताच त्याने चोरीची कबुली दिली. मात्र एक रहस्य पण सांगितले. पती रवींद्र यानेच गाडीची दुसरी चावी देत गाडी चोरण्यास सांगितले होते. ही गाडी वित्तीय कंपनीच्या कर्जावर घेतली असल्याने ती विकून दोघे पैसे वाटून घेवू, असे रवींद्र याने आमिष दिल्याचे दुचाकी चोर दशरथ याने कबूल केले. पोलिसांनी रवींद्र व दशरथ या दोघांनाही अटक केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The husband turned out to be a two wheeler thief incidents in wardha pmd 64 ssb

First published on: 09-12-2023 at 14:38 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×