scorecardresearch

Premium

भंडारा : नर्सिंग महाविद्यालयातील ४७ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, काहींची प्रकृती गंभीर

भंडारा शहरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या जवळपास ४७ विद्यार्थिनींना काल रात्री जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

nursing college Bhadara food poisoning
भंडारा : नर्सिंग महाविद्यालयातील ४७ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, काहींची प्रकृती गंभीर (प्रातिनिधिक छायाचित्र)

भंडारा : शहरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या जवळपास ४७ विद्यार्थिनींना काल रात्री जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात काही विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा – गोंदिया : धक्कादायक..! मुलाने घेतला वडिलांच्या हत्येचा बदला अन् रचला अपघाताचा बनाव

in Kalyan student beaten for playing cricket
कल्याणमध्ये क्रिकेट खेळण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण
salary criteria of postgraduate doctors
खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर डॉक्टरांच्या विद्यावेतन निकषाला छेद! निवासी डॉक्टर संतप्त…
19 thousands of scholarship applications are pending in colleges
नागपूर : शिष्यवृत्तीचे १९ हजारांवर अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित
Colleges are responsible for barring ineligible students in BHMS examination
बीएचएमएस परीक्षेत अपात्र विद्यार्थ्यांना रोखण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर, आरोग्य विद्यापीठाची सूचना

हेही वाचा – गडचिरोली : ‘एमआयडीसी’साठी जमीन देण्यास नकार, अधिग्रहणावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष

भंडारा येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात २०० विद्यार्थिनी एएनएम आणि जीएनएमचे शिक्षण घेत आहेत. काल रात्री जेवण आटोपल्यावर काही विद्यार्थिनींना अचानक उलट्या, मळमळ, डोकेदुखी, ताप येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने त्यांना ताबडतोब जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारकरिता दाखल केले. रात्रीपासून या विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून यातील ७ विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर तर एक विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 47 female students of nursing college in bhadara got food poisoning some are in critical condition ksn 82 ssb

First published on: 09-12-2023 at 14:07 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×