Premium

विभागीय कार्यालयाला टाळे लागताच एसटी महामंडळ ताळ्यावर! कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदानासाठी…

हादरलेल्या महामंडळ प्रशासनाने धावपळ करीत ५३ लाखांचा धनादेश महसूल विभागाला सुपूर्द केला.

seal affixed office removed ST corporation administration cheque 53 lakhs revenue department buldhana
विभागीय कार्यालयाला टाळे लागताच एसटी महामंडळ ताळ्यावर! कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदानासाठी… (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

बुलढाणा: कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे उपदान देण्यास अक्षम्य टाळाटाळ केल्याने एसटी महामंडळाचे बुलढाणा विभागीय कार्यालयाला टाळे (सील) लावण्यात आले होते. यामुळे हादरलेल्या महामंडळ प्रशासनाने धावपळ करीत ५३ लाखांचा धनादेश महसूल विभागाला सुपूर्द केला. त्यामुळे कार्यलयाला लावण्यात आलेले ‘सील’ काढण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे तब्बल ५३ लाख रुपये महामंडळाकडे थकीत आहे. उच्च न्यायालयाने मागील २५ सप्टेंबर रोजी रक्कम अदा करण्याचे आदेश पारित केले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही महामंडळाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे त्यांची जमीन जप्त करून शासनाच्या नावे करण्यात आली. या उप्परही प्रशासन व अधिकारी ढिम्म राहिल्याने बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने गुरुवारी संध्याकाळी मलकापूर मार्गावरील विभागीय कार्यालय सील केले.

हेही वाचा… बिबट्याचा शेतमजुरावर हल्ला; शेतकरी धावून आल्याने बचावला युवक

यामुळे घाबरगुंडी उडालेल्या महामंडळाने धावपळ करीत ५ डिसेंबर रोजीचा ५३ लाख रुपयांचा धनादेश पथकाकडे दिला. यानंतर कार्यलयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलेले सील काढण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The seal affixed to the office was removed after st corporation administration handed over a cheque of 53 lakhs to the revenue department in buldhana scm 61 dvr

First published on: 02-12-2023 at 19:57 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा