नागपूर : तुम्हाला जंगल बघायचे असेल तर पेंच, कान्हा, बांधवगड जा, पण तुम्हाला वाघ बघायचा असेल तर मात्र तुम्हाला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातच यावे लागेल. सफारीदरम्यान या व्याघ्रप्रकल्पाचे पर्यटक मार्गदर्शक देखील हेच सांगतात. पर्यटक मार्गदर्शकांचे हे म्हणणे खरेही ठरते, कारण ताडोबातील वाघ असो वा वाघीण, पर्यटकांना निराश करत नाहीत. ‘राणी’ ही त्यातलीच खास. तिच्या राजेशाही थाटाची झलक अमरावती येथील अप्पर आयुक्त व वन्यजीवप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकार गजेंद्र बावणे यांनी अचूक टिपली.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघ आणि वाघिणींना अभिनेते, अभिनेत्री तसेच चित्रपटातील पात्रांची नावे दिली आहेत. पर्यटकांनीची ती नावे दिली आहेत. कित्येकदा तर हे पर्यटक मार्गदर्शकच पर्यटकांना तशी विनंती करतात. ताडोबातील ‘राणी’ या वाघिणीचेही असेच नामकरण झाले. ती येते आणि पर्यटकांना छायाचित्रासाठी जणू ‘पोझ’ देऊन जाते. त्या जंगलावर जणू तीचे साम्राज्य आहे, अशा तऱ्हेने ती वळते. ती सरळ पर्यटकांच्या डोळ्यात पाहते आणि म्हणूनच ती निर्भय आहे, असे म्हणले जाते. दोन वर्षांपूर्वी मध्य चांदामध्ये देखील कारवा-बल्लारशा सफारी प्रवेशद्वार सुरू झाले. येथील जंगलही चांगले आहे आणि व्याघ्रदर्शनही होते. त्यामुळे या प्रवेशद्वारातूनही पर्यटनासाठी पर्यटकांचा ओढा वाढला आहे. येथे सफारी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागत नाही. याठिकाणी ‘लीसा’ ही वाघीण आणि तिचे चार बछडे आहेत. तसेच ‘गुरू’ आणि ‘काला’ या वाघांचेही वास्तव्य आहे. याच परिसरातील पाणवठ्यावर आपला राजेशाही थाट जपत ‘राणी’ आली. वाघीण आपल्या बचड्यांना सारे काही शिकवते.

banana raita recipe
श्रावणी सोमवारी बनवा केळ्याचे रायते; नोट करा साहित्य आणि कृती
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Old man sell samosa poha on Road not for money motivational story of udaipur rajasthan
“पैशासाठी नाहीरे…” या आजोबांच्या कष्टामागचं कारण ऐकून तुमचाही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल; वाचा नक्की काय घडलं?
How to make sweet potato cutlets,
Shravan 2024: श्रावणी सोमवारच्या उपवासाला बनवा चविष्ट रताळ्याचे पॅटीस; वाचा सोपी रेसिपी
Ambadas Mohite, Rakshabandhan, Maharashtra, abuse-free society, gender equality, respect for women,
रक्षाबंधनाला, मी कोणालाही आई-बहिणीवरून शिव्या देणार नाही, असे वचन…
Maharashtrian batatyachi bhaji recipe naivedya recipe
नैवेद्याची बटाटा भाजी; १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Independence day 2024 | a daughter wrote a emotional letter to her martyred father
सलमान, अक्षयला हिरो मानणारी मी; मला कळलेच नाही की माझ्या घरात खरा हिरो होता ज्याने देशासाठी…; वाचा, एका लेकीचं शहीद वडिलांना लिहिलेलं पत्र
Ratalyache bhaji recipe in marathi
Shravan 2024: श्रावणी सोमवारच्या उपवासाला बनवा चविष्ट रताळ्याची भाजी, वाचा सोपी रेसिपी
मध्य चांदाची “राणी” कोण? तिच्या राजेशाही थाटाचा सोहोळा एकदा अनुभवाच…

अधिवास निर्माण करण्यापासून तर उदरनिर्वाहपर्यंत. यात नवीन काहीच नाही, पण “राणी” चा राजेशाही थाटच न्यारा. या सर्व गोष्टी ती पण तिच्या बचड्यांना शिकवते, पण त्यात तिच्या राजेशाही थाटाची झलक दिसून येते. मध्य चांदा विभागातील कारवा येथे नैसर्गिक पाणवठ्यावर ती बचड्यासह पाणी पिण्यासाठी आली. दोघेही अगदी शिस्तीत पाणी पीत होते. दोघांचीही पद्धत अगदीच सारखी. दोघांचेही पाण्यात पडलेले प्रतिबिंब अगदीच सारखे. ते प्रतिबिंब न्याहाळण्याचा दोघांचाही “टायमिंग” अगदी सारखा. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही की घाई नाही. अगदी आरामात ती पाणी पीत होती. “राणी” या वाघिणीचा आणि तिच्या राजेशाही थाटाचा सोहोळा अमरावती येथील अप्पर आयुक्त व वन्यजीवप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकार गजेंद्र बावणे यांनी अचूक टिपला.