नागपूर : जगात चहाप्रेमींची कमी नाही. मग तो चहा दुधाचा असो वा बिना दुधाचा.. साखरेचा असो वा बिना साखरेचा, किंवा तो गुळाचाही.. चहा तो शेवटी चहाच असतो. कामादरम्यान आलेला थकवा घालवणारा चहाच असतो. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाना करणारा चहाच असतो आणि म्हणूनच २१ मे हा दिवस चहाला समर्पित करुन यादिवशी आंतरराष्ट्रीय चहा दिवस अर्थातच ‘इंटरनॅशनल टी डे’ साजरा केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चहा दिवसाचा इतिहासही तेवढाच रंजक आहे. भारतात चहा आणला तो ब्रिटिशांनी आणि भारतीयांना चहाची गोडी लावली ती देखील ब्रिटिशांनी असे सांगितले जाते. तर याच भारतात २००५ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बांगलादेश, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा आणि टांझानिया या चहा उत्पादक देशांमध्ये तो साजरा करण्यात आला. या देशात वेगळ्याने, त्या देशात वेगळ्याने तो साजरा करण्याऐवजी तो एकाचवेळी जगभरात का साजरा केला जाऊ नये म्हणून मग भारतानेच २००५ साली आंतरराष्ट्रीय चहा दिवसाचा प्रस्ताव मांडला आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने त्यावर शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्यात येतो.

हेही वाचा – नागपूर : ‘रूफ टॉप’ रेस्टॉरेंटला वादळाचा धोका, महपालिकेचे कारवाईचे संकेत

कदाचित सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारे चहा हे एकमेव पेय असावे. प्रसंग कोणताही असो, दु:खाचा किंवा आनंदाचा, पण चहाची हजेरी तेथे असतेच. सणसमारंभ, आदरातिथ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा चहाच असतो. हाच चहा जगभरातील लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे एक साधण बनला आहे. नागपूरचेच उदाहरण सांगायचे तर ‘डॉली’ चहावाल्याची भूरळ थेट बिल क्लिंटन यांनाही पडली आणि त्याच्या हातच्या चहाची चव त्यांनी चाखली. त्यानंतर हा चहावाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला. या चहाची रुप आता बदलली आहेत. ‘ग्रीन टी’ म्हणजे अर्थातच हरित चहा अनेकांच्या आरेाग्याशी जोडला गेला आहे. त्याचा वजन कमी करण्यासाठी उपयोग तर होतोच, पण आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम देखील होतो.

हेही वाचा – अनैतिक संबंधाच्या संशयातून आईनेच घेतला मुलीचा जीव

वेगवेगळ्या फुलांचा चहा तयार केला जातो. दरम्यानच्या काळात तर चहाच्या नावाने वेगवेगळे ब्रँड तयार झाले होते. अमृततुल्य चहा हा त्यातलाच एक. सुरुवातीचे काही महिने लोकांना त्याची क्रेज होती, पण आता ही गर्दी ओसरुन पुन्हा चहाच्या साधारण टपऱ्यांवर वळली आहे. तात्पर्य एवढेच की चहाने कितीही रुप बदलली, तरी चहाप्रेमींची संख्या काही ओसरली नाही, तर त्यात आणखी भरच पडत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today is international tea day information about it rgc 76 ssb