नागपूर: राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील यात्रा नागपुरात विधान भवनाजवळ धडकली. मोठ्या संख्येने असलेल्या मोर्चेकऱ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मात्र पवार यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते का संतापले? याचे कारण उघड झाले आहे.

रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा ही राज्यभरात ८०० किमीचा प्रवास करुन सोमवारी नागपुरात दाखल झाली. यात्रेचा समारोप नागपुरात झाला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. सरकारने निवेदन स्वीकारण्यासाठी जबाबदार व्यक्तीना पाठवावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. मात्र सरकारच्यावतीने निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपचे शहर अध्यक्ष दाखल झाले. त्यावरून रोहित पवार व त्यांचे सहकारी सरकारच्या वागणुकीवर संतापले. व मोठ्या संख्येने विधान भवनाच्या दिशेला निघाले . पोलिसांनी त्याना अडवण्यासाठी कठडे लावण्यात आले होते.

Do Anjali Damania and Suhas Kande have the right to challenge the acquittal Chhagan Bhujbals question in HC
महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्तीला आव्हान देण्याचा अधिकार दमानिया, कांदे यांना आहे का? उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान भुजबळ यांच्याकडून प्रश्न उपस्थित
Crime against former minister Anil Deshmukh wardha
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा? आदर्श आचारसंहिता…
raj thackeray, mns, Mahayuti, lok sabha 2024 election, Uddhav Thackeray group
महायुतीला पाठिंबा दिल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाकडे ओढा वाढला
Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार

हेही वाचा… ओबीसी आंदोलक अक्षय लांजेवार यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात भरती

राष्ट्रवादीचे इतक्या मोठ्या संख्येतले कार्यकर्ते विधान भवनच्या दिशेला येत असल्याचं पाहिल्यानंतर पोलीस सतर्क झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात दाखल झाला. कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटीलही सहभागी झाले. पोलिसांनी रोहित पवार यांना रोखलं. तसेच काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांकडून धरपकड सुरु झाल्यानंतर रोहित पवार यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांनी कठडे तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला.