वाशीम : पंतप्रधान किसान योजनेची सन २०१९-२० पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई- केवायसी पूर्ण करणार नाही किंवा बँक खाती आधार संलग्न‍ करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात येणार आहेत.

ई- केवायसी करण्याकरीता मे, जुलै व ऑगस्ट महिन्यात कृषी विभागाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली होती. परंतु अद्यापही जिल्ह्यातील १४ हजार ८२९ लाभार्थ्यांची ई – केवायसी प्रलंबित आहे. तसेच ११ हजार ११७ लाभार्थ्यांची आधार सिडींग प्रलंबित आहे. ई- केवायसी व आधार सिडींग न करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे  वगळण्यासाठी शासनस्तरावरून सूचना प्राप्त झाल्याने लाभार्थ्यांनी ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्नीसकरण करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास ७ सप्टेंबर २०२३ पासून अशा शेतकऱ्यांची नावे रद्द करण्यायची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती  जिल्हा‍ अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी दिली.

Shikhar Bank Malpractice Case There has been no irregularity in the working of the bank
शिखर बँक गैरव्यवहारप्रकरण : बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही
Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित