03 June 2020

News Flash

Coronavirus : मालेगावात करोनाचे १२ नवीन रुग्ण

करोना बाधित रुग्णांचा नाशिक जिल्ह्याचा आकडा ८५१ झाला आहे.

संग्रहित छायाचित्र

मालेगाव : बुधवारी मालेगावात आणखी १२ रुग्ण आढळून आल्याने शहर आणि तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६७७ वर पोहचली आहे. करोना बाधित रुग्णांचा नाशिक जिल्ह्याचा आकडा ८५१ झाला आहे.

सकाळी मालेगावातील एकूण ७५ अहवाल प्राप्त झाले. त्यात १२ रुग्णांचा अहवाल सकारात्मक असून ६३ जणांचा अहवाल नकारात्मक असल्याचे आढळून आले. सकारात्मक अहवालांमध्ये शहराला लागून असलेल्यामध्ये येथील आठ जणांचा समावेश आहे. तसेच सोयगाव, आंबेडकरनगर, इक्बाल नबी चौक आणि अमननगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील शंभर पैकी आठ जणांचा अहवाल सकारात्मक आणि ९२ जणांचे अहवाल नकारात्मक आले होते. सकारात्मक अहवालांमध्ये मनमाड येथील तीन आणि मालेगाव येथील मोतीबाग नाका, रावळगाव, चांदवड, पोखरी (नांदगाव), नांदूर शिंगोटे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यापैकी रावळगाव येथील महिलेचा अहवाल येण्याआधीच मृत्यू झाला. ही महिला मालेगाव महापालिकेत सफाई कर्मचारी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 3:59 am

Web Title: 12 new corona patients in malegaon zws 70
Next Stories
1 पावसाळी कामांकडे दुर्लक्ष नको
2 नाशिक, मालेगाव पालिका लाल क्षेत्रात
3 ५० कोटींच्या कामांना चर्चेविना मंजुरी
Just Now!
X