01 October 2020

News Flash

‘डायल १०८’ रुग्णवाहिका सेवेविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन

१०८ ला कॉल करण्यास कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही हे स्पष्ट करत रुग्णवाहिकेचे फायदे समजाविण्यात आले.

तालुक्यातील बाभूळगाव येथील एसएनडी तंत्रनिकेतनमध्ये महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आपत्कालीन ‘डायल १०८’ या रुग्णवाहिकेची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

शासन व बीव्हीपी इंडिया यांच्या वतीने ही रुग्णवाहिका चालविली जात आहे. या रुग्णवाहिकेसाठी केव्हा कॉल करावा, रुग्णाला याद्वारे कोणत्या अत्यावश्यक सेवा मिळू शकतात, जवळच्या रुग्णवाहिकेला कसा कॉल करावा, याची माहिती १०८ रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलकुमार कुलथे यांनी दिली.

१०८ ला कॉल करण्यास कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही हे स्पष्ट करत रुग्णवाहिकेचे फायदे सविस्तरपणे समजाविण्यात आले.

ही माहिती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इतरांनाही मिळू शकेल, असा आशावाद प्राचार्य अनंत जोशी यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2015 3:02 am

Web Title: awareness to student about ambulance service
टॅग Awareness,Service
Next Stories
1 ग्रामीण महिलांची पाण्याची समस्या दूर करण्याचे स्वप्न – पंकजा मुंडे
2 संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानला देणगी
3 उद्घाटन सोहळ्यात नाशिक भाजपमधील सुंदोपसुंदी उघड
Just Now!
X