नाशिक सायकलिस्टच्या सहकार्याने आखणी

नाशिक : मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या मात्र प्रतिसादाअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीच्या सार्वजनिक सायकल सेवेला पुन्हा सुरु करण्यासाठी कंपनीला नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे सहकार्य घेण्याची वेळ आली आहे.

सायकलचा वापर वाढावा या उद्देशाने सायकलिस्ट फाऊंडेशन, नाशिक स्मार्ट सिटी आणि महापालिका यांच्यावतीने १५ आणि १६ फेब्रुवारी या कालावधीत ‘पेलेटॉन २०२०’ आणि ‘स्मार्ट सिटी की स्मार्ट सवारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांची घोषणा स्मार्ट सिटी कंपनी करणार होती. परंतु, अनेकदा जाहीर होऊनही कंपनीने ऐनवेळी माघार घेतली होती. शुक्रवारी या घोषणेची जबाबदारी नाशिक सायकलिस्टकडे सोपविली गेल्याचे दिसून आले.

स्मार्ट सिटी कंपनीचे स्मार्ट रस्त्यासह अनेक प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दीड ते दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या रस्ता कामाने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. २६ जानेवारीची अंतीम मुदत पाळली जाते की नाही हे गुलदस्त्यात आहे. सार्वजनिक सायकल सेवेचा उपक्रम अनेक कारणांनी अडचणीत आला आहे. काही सायकल चोरीला गेल्या. काही ठिकाणी सायकलची मोडतोड झाली. सायकल थांबे कचऱ्याच्या साम्राज्यात अडकले. सायकल सेवेला प्रारंभी मिळालेला प्रतिसाद कालांतराने ओसरला. हा प्रकल्प गुंडाळून घेण्याची नामुष्की ओढवू नये म्हणून कंपनीने जनजागृतीसाठी धडपड सुरू केली आहे.

पेलेटॉन आणि स्मार्ट सिटी की स्मार्ट सवारी हे उपक्रम स्पर्धात्मक आणि अस्पर्धात्मक या प्रकारात घेतले जातील. अस्पर्धात्मक फेरी शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार आहे. यामध्ये आठ      वर्षांपासून ते वयोवृध्दापर्यंत कोणी सहभागी होऊ शकते. स्पर्धात्मक गटात नाशिक आणि बाहेरील सायकलपटूंना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी सव्वा तीन लाख रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

नाशिक सायकलची राजधानी व्हावे यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहे. त्याची सुरूवात रविवार सायकल वारमधून झाली. २६ जानेवारी रोजी सायकलपटू निश्चित झालेल्या मार्गावर फेरी मारून सायकलिंगबाबत जनजागृती करणार आहेत. या फेरीची सुरूवात राजीव गांधी भवन येथे झेंडावंदन झाल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या शिवाय २२ सप्टेंबर हा दिवस वाहनरहित म्हणून साजरा केला जाईल. या दिवशी सर्वानी दिवसभर सायकलचा वापर करावा असे आवाहन केले जाणार आहे. सायकल जनजागृतीत महिलांचा सहभाग घेतला जाईल. नाशिक सायकलिस्टतर्फे आयोजित पेलोटोनचे हे नववे वर्ष असून यंदा स्मार्ट सिटी सोबत हा उपक्रम होणार आहे. यावेळी स्पर्धात्मक स्वरुप नसलेल्या कार्यक्रम होईल. यामध्ये पर्यावरण स्नेही, कॉर्पोरेट आणि लहान मुलांसाठी सायकल फेरीचा समावेश असेल. इच्छुकांनी नाशिक सायकलिस्टच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.की स्मार्ट सवारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमांची घोषणा स्मार्ट सिटी कंपनी करणार होती. परंतु, अनेकदा जाहीर होऊनही कंपनीने ऐनवेळी माघार घेतली होती. शुक्रवारी या घोषणेची जबाबदारी नाशिक सायकलिस्टकडे सोपविली गेल्याचे दिसून आले. स्मार्ट सिटी कंपनीचे स्मार्ट रस्त्यासह अनेक प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दीड ते दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या रस्ता कामाने शहरवासीय त्रस्तावले आहे. २६ जानेवारीची अंतीम मुदत पाळली जाते की नाही हे गुलदस्त्यात आहे. सार्वजनिक सायकल सेवेचा उपक्रम अनेक कारणांनी अडचणीत आला आहे. काही सायकल चोरीला गेल्या. काही ठिकाणी सायकलची मोडतोड झाली. सायकल थांबे कचऱ्याच्या साम्राज्यात अडकले. सायकल सेवेला प्रारंभी मिळालेला प्रतिसाद कालांतराने ओसरला. हा प्रकल्प गुंडाळून घेण्याची नामुष्की ओढावू नये म्हणून कंपनीने जनजागृतीसाठी धडपड सुरू केली आहे. पेलेटॉन आणि स्मार्ट सिटी की स्मार्ट सवारी हे उपक्रम स्पर्धात्मक आणि अस्पर्धात्मक या प्रकारात घेतले जातील. अस्पर्धात्मक फेरी शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार आहे. यामध्ये आठ वर्षांपासून ते वयोवृध्दापर्यंत कोणी सहभागी होऊ शकते. स्पर्धात्मक गटात नाशिक आणि बाहेरील सायकलपटूंना सहभागी होता येईल. २६ जानेवारी रोजी सायकलपटू निश्चित झालेल्या मार्गावर फेरी मारून सायकलिंगबाबत जनजागृती करणार आहेत. या फेरीची सुरूवात राजीव गांधी भवन येथून होणार आहे.