नाशिक : करोना संसर्गामुळे  बंद करण्यात आलेल्या शिवमंदिराबाहेरूनच महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना बम बम भोलेचा गजर करावा लागला. त्र्यंबके श्वर येथेही मंदिर भाविकांसाठी बंद राहिले. परंतु, विश्वस्त तसेच तुरळक नागरीकांच्या उपस्थितीत पालखीपूजन करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फु लांची सजावट करण्यात आली होती.

यंदा महाशिवरात्र उत्सवावर करोनाचे सावट असल्याने मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांना मनाई करण्यात आली. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबके श्वर येथेही १४ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. गुरूवारी त्र्यंबके श्वर देवस्थान बंद असले तरी शिवलिंगाची नैमित्तीक पूजा करण्यात आली.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मर्यादत लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी पालखी सोहळा काढण्यात आला. त्र्यंबके श्वर देवस्थानच्या पालखी मार्गात श्रींची पालखी कोठेही थांबविण्यात आली नाही. भाविकांनी दुरूनच पालखीचे दर्शन घ्यावे, म्हणून प्रशासनाच्या वतीने सातत्याने सुचना करण्यात येत होत्या. पालखी सोहळ्यात भाविकांनी गर्दी करण्याचा प्रयत्न के ला. परंतु, पोलिसांनी भाविकांना आवर घातला.

गोदाकाठावरील श्री कपालेश्वर देवस्थान परिसराकडे जाणारे सर्व रस्ते दुभाजकाने बंद करण्यात आले होते. भाविकांना मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला. बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने शुकशुकाट होता. मंदिरात नैमित्तीक पूजा सुरू होती. सोमेश्वर येथील शिवमंदिरही बंद असल्याने व्यावसायिकांचा हिरमोड झाला. शहर परिसरातील लहान मंदिरे खुली राहिली. परंतु, नंतर तीही बंद करण्यात आली.