शिबिराच्या नावाखाली रुग्ण, नातेवाईकांची फसवणूक

जिल्हा परिसरात वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात आहे. विशेषत आयुर्वेद शिबिराच्या नावाखाली बालकांच्या पालकांकडून पैसे वसूल केले जातात. आरोग्य विभागाकडून या सर्व प्रकारांना चाप बसावा यासाठी जिल्ह्य़ात कुठल्याही प्रकारचे आरोग्य शिबीर घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

जिल्हा परिसरात विविध संस्थांमार्फत आयुर्वेदीक औषधांच्या नावाखाली गावागावांत शिबिराचे आयोजन करण्यात येते.  शिबिरांसाठी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींची मदत घेण्यात येते. मात्र त्यातून रुग्णांची लूट केली जात आहे. संस्थेच्या वतीने लहान मुलांचे सुवर्णप्राशन, कॅल्शियम, जीवनसत्त्व वाढविणे अशा नावाखाली भरमसाठ किंमतीची १०० ते २०० रुपयांची औषधे पालकांच्या तसेच रुग्णांच्या गळ्यात मारली जात आहे. त्यासाठी नोंदणी शुल्क देखील आकारले जात आहे. प्रसंगी हे कोणाच्या जीवावर बेतू शकते. आपली लुबाडणूक होत आहे, यातील गांभीर्य लोकांसह आरोग्य विभागाच्या लक्षात येत नाही. ठराविक काळ गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे रुग्णाच्या लक्षात येते. या विरोधात तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो. दुसरीकडे आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून शिबिराच्या नावाखाली नफेखोरी वाढली आहे. बॉम्बे नर्सिग अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणी करणारे दवाखाने, डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार आरोग्य विभागाला आहे. त्यामुळे अशा बनावट डॉक्टरांवर कारवाई करतांना र्निबध येतात.या पाश्र्वभूमीवर, जिल्हा परिसरात कोणत्याही प्रकारचे आरोग्य शिबीर घेण्यास आरोग्य विभागाने बंदी केली आहे.

परवानी आवश्यक; फसवणुकीची तक्रार करा

शिबीर घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असून शिबीरात कुठली औषधे दिली जातील याची माहिती देणे गरजेचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपली लूट होत आहे हे लक्षात आल्यास थेट जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन डॉ. डेकाटे यांनी केले आहे. तसेच, ग्रामसभा, बैठकांमध्ये याविषयी जनजागृती करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.