04 March 2021

News Flash

पतीचे ३ महिलांशी विवाहबाह्य संबंध, नाशिकमध्ये महिलेची आत्महत्या

माहेरुन १० लाख रुपयांचा हुंडा घेऊन ये असा तगादा सासरच्यांनी लावला होता. या छळाला कंटाळून सारिकाने गळफास घेत आत्महत्या केली.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

नाशिकमध्ये पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सारिका पगार असे या महिलेचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह दीर आणि सासूविरोधात हुंडा बळी, शारीरिक व मानसिक छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकमध्ये राहणाऱ्या सारिकाचा विवाह हेमंत पगार याच्याशी झाला होता. मात्र, माहेरुन १० लाख रुपयांचा हुंडा घेऊन ये असा तगादा सासरच्यांनी लावला होता. या छळाला कंटाळून सारिकाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सारिकाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत तिने पती आणि सासरच्या मंडळींचा उल्लेख केला होता. ‘पतीचे बाहेर ३ महिलांसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. तो नेहमी मला मारहाण करतो. माझ्याशी लग्न करुन त्याने मला आणि तुम्हालाही फसवले आहे. मी मेल्यावर माझ्या अंगाला त्याला आणि त्याच्या घरच्यांना हात लावू देऊ नका. आई, बाबा मला माफ करा’ असे तिने या चिठ्ठीत लिहून ठेवले होते. या आधारे पोलिसांनी सारिकाचा पती हेमंत, सासू, सासरे आणि दिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील हेमंतला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 4:44 pm

Web Title: husband extramarital affairs woman commits suicide
Next Stories
1 शहरासाठी पुरेशा जलसाठय़ाची तजवीज
2 तुकाराम मुंढेंविषयी महापौर परिषदेत ठरावच नाही
3 रोजगार प्रोत्साहन योजनेचे लाभार्थी अत्यल्प वेतनामुळे नाराज
Just Now!
X