गुंतवणुकीच्या नियोजनावर मार्गदर्शन

नाशिक : सर्वोच्च टप्प्यानजीक असलेले भांडवली बाजारांचे प्रमुख निर्देशांक, स्थिरावलेली मालमत्ता क्षेत्रातील हालचाल, स्वस्त होऊ पाहणारे गृह तसेच इतर कर्जाचे व्याजदर, सण-समारंभाच्या तोंडावर मौल्यवान धातूंच्या दरात होणारी उसळी, या पार्श्वभूमीवर, आपल्या गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे, याचे उत्तर ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता नाशिक महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ गौरव जाजू, सुयोग काळे मार्गदर्शन करणार आहेत.

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रम शुक्रवारी दुपारी चार वाजता महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात ‘समजदार गुंतवणुकीचे मर्म’ या विषयावर गौरव जाजू, तर ‘गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन’ या विषयावर सुयोग काळे मार्गदर्शन करणार आहेत.

कुटुंबाचा नित्य जमा-खर्च आणि जीवनातील ठरविलेली मोठी आर्थिक उद्दिष्टय़े आणि स्वप्नांची पूर्ती करीत करबचतही गुंतवणुकीतून साध्य करता येते. सेवानिवृत्तीनंतर निर्धास्त जीवन जगण्याची तयारी कशी करता येईल, आपल्या गुंतवणुकीवर व्याजाचा अधिक परतावा मिळण्याबरोबर पैसे सुरक्षित कसे राहू शकतील, याची विस्तृत माहिती ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. गुंतवणुकीविषयी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना सोप्या भाषेतील उत्तरांसह दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन होईल.

शुक्रवारचा कार्यक्रम महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.

कधी ?

शुक्रवारी १४ फेब्रुवारी

कुठे ?

तिसऱ्या मजल्यावरील सभागृह, राजीव गांधी भवन, महापालिका मुख्यालय दुपारी चार वाजता

तज्ज्ञ मार्गदर्शक – गौरव जाजू, सुयोग काळे

(म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी या बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.)