News Flash

मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत मणिपूर विजेता

यजमान महाराष्ट्राला मुलींमध्ये तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

मणिपूरने येथे आयोजित सातव्या मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यजमान महाराष्ट्राला मुलींमध्ये तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

येथील नवरंग मंगल कार्यालयात आयोजित स्पर्धेत पंजाबने दोन्ही गटांत उपविजेतेपद तर मुलांमध्ये दिल्लीने तृतीय स्थान मिळविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते प्रकाश काटुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्माकर पाटील, शेषनारायण लोंढे, राजकुमार सोमवंशी, विलास वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. दुबळे यांनी मार्गदर्शन करताना ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनी याच वयात खेळायला सुरुवात केली होती, असे सांगितले. आपणही ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहा. त्या दृष्टीने सरावात सातत्य ठेवा. यश हमखास मिळेल, असे नमूद केले. प्रास्ताविक अशोक दुधारे, स्वागत राजू शिंदे यांनी केले. आभार मधुकर देशमुख यांनी मानले.

नाशिक जिमखाना अध्यक्षपदी पुन्हा नरेंद्र छाजेड

शहरातील क्रीडा क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या नाशिक जिमखाना या संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नरेंद्र छाजेड यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी नितीन मोडक, कार्याध्यक्षपदी प्रमोद रानडे, चिटणीसपदी राधेश्याम मुंदडा तसेच कोषाध्यक्षपदी नितीन चौधरी यांचीही बिनविरोध निवड झाली.

रविवारी झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत जिमखान्याच्या झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत ही निवड करण्यात आली. विविध खेळांचे प्रमुख म्हणून प्रकाश सिकची (बॅटमिंटन), अनिल चुंबळे (बिलियर्डस), नितीन मोडक (टेनिस), शेखर भंडारी (टेबल टेनिस), मिलिंद जोशी (शुटिंग), राजेश भरवीरकर (बास्केटबॉल), अली असगर आदमजी (क्रिकेट), अ‍ॅड. झुलकरनैन जागीरदार (बुद्धिबळ), परमजीत बग्गा (जिम्नॅशियम) यांची निवड करण्यात आली. अ‍ॅड. नंदकिशोर लाहोटी, अ‍ॅड. प्रशांत जोशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 1:20 am

Web Title: nahsik sport news
Next Stories
1 ‘ब्लॅक आऊट’ आंदोलनास अत्यल्प प्रतिसाद
2 काही मुद्यांवर अजुनही मतभेद कायम
3 गंगापूरमधून पाणी सोडल्यास पूरस्थिती?
Just Now!
X