पाच टाक्या आणि नऊ टन खत देणार

जागतिक पर्यावरण दिना निमित्त वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वन महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून यंदा पाच हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. महोत्सवासाठी महापालिकेने मदतीचा हात पुढे केला असून प्रत्येकी पाच हजार लिटर क्षमतेच्या पाच पाण्याच्या टाक्या देण्यात येणार आहे. तसेच खत प्रकल्पातून नऊ टन खतही महोत्सवासाठी दिले जाईल.

वन महोत्सव िदडोरी जकात नाक्याजवळील वन विभागाच्या जागेत साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. तब्बल पाच हजार खड्डे रोप लागवडीसाठी तयार करण्यात आले आहेत. वृक्ष लागवडीपूर्वी सर्व खड्डय़ांमध्ये खत टाकण्यात आले आहे. याचा फायदा रोपांचे चांगले संगोपन करण्यासाठी होईल.

वन महोत्सवात नाशिकमधील सामाजिक संघटना, नाशिककर व आपलं पर्यावरण संस्थेचा सहभाग असणार आहे.

मागील महिन्यापासून महोत्सवाची माहिती विविध जॉिगग ट्रॅक, विविध सामाजिक संस्था व व्याख्यानमाला यांना देण्यात आली आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगण्याबरोबर पर्यावरणाविषयक जनजागृतीचे धडे देण्यात आले. पर्यावरण दिनाच्या उपक्रमासाठी महापालिका पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या पाच टाक्या (पंचवीस हजार लिटर पाणी) उपलब्ध करणार आहे.

वन महोत्सवात बांबू, मुरुडशेंड, करवंद, काळाकुडा, काटेपांगरा, बुचपागारा, खिरणी, पुत्रंजीवा, पळस, वरूण, काटेसावर, कडूिनब, आपटा, वड, िपपळ, पापडा, भोकर, खैर, जंगली बदाम, फणस, आसाना, विलायती चिंच, बेल, साग, कहांडोळ आदी पर्यावरणपूरक तसेच दुर्मीळ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या माध्यमातून पक्ष्यांना निवाराही उपलब्ध होईल, असा पर्यावरणप्रेमींना विश्वास आहे. वन महोत्सव साजरा होत असलेल्या जागी विविध पक्ष्यांचा वावर आहे. प्रामुख्याने येथे मोरांची संख्या लक्षणिय असून रोपांच्या संवर्धनानंतर त्यांना मुबलक हिरवाई उपलब्ध होईल.