पळसे, एकलहरे जिल्हा परिषद गटातील शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
जनतेचे व गुरांचे पिण्याचे पाणी तसेच शेतीच्या पाण्याचे सरकारने चुकीचे नियोजन करून जिल्ह्य़ातील धरणांमधील पाणी यापूर्वीच सोडून दिल्याने जिल्ह्य़ात अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केला आहे. नाशिक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पळसे व एकलहरे या जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचा मेळावा शिलापूर येथे घेण्यात आला. त्यावेळी अ‍ॅड. पगार बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत सरकार गंभीर नाही. अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने विशेष मदत जाहीर करणे आवश्यक होते. परंतु केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. १९७२ च्या दुष्काळापेक्षा कठीण दुष्काळी परिस्थिती यावर्षी आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला दुष्काळग्रस्तांचे हाल दिसत नसून कुठल्याही ठोस उपाययोजना करताना सरकार दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने आंदोलने करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून यापुढील काळातदेखील आक्रमक आंदोलने करून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पगार यांनी दिला. आर्थिक विवंचनेत सापडलेला व कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करत आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच कृषिपंपांचे वीज देयक माफ करावे, चारा व पाणी टंचाई तसेच गोवंश हत्याबंदीमुळे शेतकऱ्यांकडील भाकड जनावरे सरकारने विकत घ्यावीत किंवा या जनावरांसाठी सरकारने पाणी व चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, पक्ष निरीक्षक उत्तमराव आहेर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, पंचायत समितीच्या सभापती मंदा निकम, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष तानाजी गायधनी आदींचीही भाषणे झाली.
दरम्यान, वनखाते कोणताही उपयोग करत नसलेली जमीन आदिवासी वर्षांनुवष्रे कसत आहेत. परंतु, ही जमीन वन खात्याच्या नावावर आहे. त्यामुळे ही जमीन स्थानिक आदिवासींच्या प्रस्तावाप्रमाणे सरकारने वर्ग करण्याची मागणी रवींद्र पगार यांनी केली आहे. ही जमीन नावावर हस्तांतरित करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या सुमारे १८ हजार प्रस्तावांपकी फक्त चार हजार ५०० प्रस्ताव निकाली काढण्यात आले असून उर्वरित प्रस्ताव तातडीने निकाली काढून आदिवासींच्या नावे जमीन करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरगाणा जिल्हा परिषद गटाची बठक िशदे दिगर येथे झाली. त्यावेळी अ‍ॅड. पगार बोलत होते. या दौऱ्यात आदिवासी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तसेच दुष्काळी परिस्थितीची पहाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी चाचपणी करून शेतकरी तसेच कार्यकर्त्यांचे मनोगत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पगार यांनी जाणून घेतले. यावेळी पक्ष निरीक्षक ज्ञानेश्वर फोकणे, तालुकाध्यक्ष जनार्दन भोये, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, सदस्य नितीन पवार आदींची भाषणे झाली
दुष्काळग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन देखील अद्यापपर्यंत मदत मिळालेली नाही. सुरगाणा तालुक्यात सुमारे १० कोटी ५१ लाख इतके प्रस्तावित अनुदान अद्यापपर्यत येथील शेतकऱ्यांना मिळालेले नसून अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची गरज पगार यांनी व्यक्त केली. पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व स्थितीमुळे जनावरांसाठी जिल्हाभर त्वरित चारा छावण्या सुरू कराव्यात, मागणी होताच पाण्याचे टँकर सुरु करावे, पावसाअभावी पिके न आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पीक कर्ज माफ करून सरकारने शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच कृषी पंपाची देयके न भरल्याने त्यांची जोडणी पुढील पीक येईपर्यंत खंडित करू नये, अशी मागणीही अ‍ॅड. पगार यांनी केली. यावेळी भाऊराव राऊत, काळू बागूल, वामन दळवी, सुरेश चौधरी या सरपंचांसह स्थानिक नेते, कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.