News Flash

उत्तर महाराष्ट्रात वीज पडून एक ठार

प्रचंड उकाडय़ाने त्रस्त नागरिकांना पावसाने काहीअंशी दिलासा दिला

उत्तर महाराष्ट्रात मालेगावसह जळगाव शहरात पारा ४२ अंशांपुढे सरकला असताना मंगळवारी जळगाव जिल्ह्य़ाच्या काही भागांत मुसळधार पाऊस झाला. भुसावळ येथे वीज पडून तरुण जागीच ठार झाला. नाशिक जिल्ह्य़ातही पावसाने तुरळक हजेरी लावली.

प्रचंड उकाडय़ाने त्रस्त नागरिकांना पावसाने काहीअंशी दिलासा दिला. भुसावळ येथील पंचशील नगरात सायंकाळी मुले क्रिकेट खेळत असतानाच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वीज पडून अश्रफ शहा अल्लबक्ष शहा (१९) हा जागीच ठार झाला. गोलू कादर शहा (१४) यासह इतर दोन लहान मुले गंभीर जखमी झाली. नाशिक शहरासह सटाणा, कळवण या तालुक्यांमध्येही पाऊस झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 12:02 am

Web Title: north maharashtra killed due to falling electricity
Next Stories
1 अशोका बिल्डकॉनच्या कार्यालयावर ईडी आणि एसीबीचा छापा
2 भाजप मेळाव्यातील राड्याप्रकरणी शिवसेनेच्या सुधाकर बडगुजरांना अटक
3 त्र्यंबकेश्वर देवस्थान विरोधात मोर्चा
Just Now!
X