आठ जणांना अटक; १४८ बनावट नोटा हस्तगत

नाशिक : गुजरातमधील बलसाडच्या धरमपूर तालुक्यात पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात जिल्ह्य़ातील सुरगाणा तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे. सुरगाणा तालुक्यात छपाई के लेल्या बनावट नोटा या गुजरात सीमारेषेवर असलेल्या भागात चलनात आणल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे.

बलसाडच्या गुन्हे अन्वेषण विभागास मिळालेल्या माहितीनुसार ११ जून रोजी समडी चौकाशेजारी असलेल्या आंबा बाजारात धरमपूर तालुक्यातील झिपरूभाई भोये यांच्याकडे ५०० रुपयांच्या ६० बनावट चलनी नोटा सापडल्या. या व्यक्तीच्या नावाने धरमपूर पोलीस ठाण्यात तक्रोर होती. तपासानंतर इतर संशयितांचाही माग काढण्यात आला. सर्व संशयितांकडून ५०० रुपयांच्या १४८ बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या. या सर्व बनावट नोटांवरील क्र मांक एकाच मालिके तील आढळले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी झिपरूभाई हा रिक्षाचालक आहे. दुसरा परशाभाई पवार (रा. मुरदड) हा झिपरू याच्याकडून गरजेनुसार नोटा घेऊन चलनात आणत होता. धरमपूर येथील चिंतूभाई भुजड यालाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या तपासाचे धागेदोरे नाशिक जिल्ह्य़ातील सुरगाण्यापर्यंत पोहोचले. सुरगाणा येथे सुरू के लेल्या ई- सेवा के ंद्रात काम करणारा अनिल बोचल (रा. बोरचोंड, सुरगाणा) याने काम बंद असल्याने कामावरील संगणक, प्रिंटर हे घरी नेले. तेथे नोटांची छपाई करण्यास सुरुवात के ली. हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्याने बनावट नोटा छापण्याचा उद्योगच सुरू के ल्याची माहिती जिल्हा

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. 

बनावट नोटांसंदर्भात गुजरात पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर संशयित अनिल बोचलसह हरिदास चौधरी (रा. मांधा, सुरगाणा), जयसिंग वळवी, भगवंत गुंबाडे (रा. गुही, सुरगाणा) यांना ताब्यात घेत गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुजरात सीमावर्ती भागात आदिवासी समाजात असलेले अज्ञान तसेच आर्थिक दुर्बल परिस्थितीचा फायदा घेत एका नोटांच्या गठ्ठय़ात चार ते पाच बनावट नोटा चलनात आणत होते. संबंधितांकडून १४८ बनावट नोटा, दोन रिक्षा, चार भ्रमणध्वनी, आधार कार्ड आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.