गुंतवणुकीच्या नियोजनाचे योग्य मार्ग

नाशिक : सर्वोच्च टप्प्यानजीक असलेले भांडवली बाजारांचे प्रमुख निर्देशांक, स्थिरावलेली मालमत्ता क्षेत्रातील हालचाल, स्वस्त होऊ पाहणारे गृह आदी कर्जाचे व्याजदर, सण-समारंभाच्या तोंडावर मौल्यवान धातूंच्या दरात होणारी उसळी, या पार्श्वभूमीवर, आपल्या गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे, याचे उत्तर ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. नाशिकमध्ये होणारा पहिलाच कार्यक्रम १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी होणार आहे.

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी पाच वाजता शहर पोलीस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात होणार आहे. हाच कार्यक्रम शुक्रवारी दुपारी चार वाजता महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात ‘समजदार गुंतवणुकीचे मर्म’ या विषयावर गौरव जाजू तर ‘गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन’ या विषयावर सुयोग काळे मार्गदर्शन करणार आहेत.

गुरुवारचा कार्यक्रम पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी यांच्यासाठी असून तो विनामूल्य आहे. शुक्रवारचा कार्यक्रम महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्वावर प्रवेश दिला जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.

कुटुंबाचा नित्य जमा खर्च आणि जीवनातील ठरविलेली मोठी आर्थिक उद्दीष्टय़े आणि स्वप्नांची पूर्ती करीत करबचतही गुंतवणुकीतून साध्य करता येते. सेवा निवृत्तीनंतर निर्धास्त जीवन जगण्याची तयारी कशी करता येईल, आपल्या गुंतवणुकीवर व्याजाचा अधिक परतावा मिळण्याबरोबर पैसे सुरक्षित कसे राहू शकतील, याची विस्तृत माहिती ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे.

गुंतवणुकीविषयी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना सोप्या भाषेतील उत्तरांसह दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन होईल.

कधी ?

शुक्रवार १४ फेब्रुवारी

कुठे ?

तिसऱ्या मजल्यावरील सभागृह, राजीव गांधी भवन, महापालिका मुख्यालय दुपारी चार वाजता

तज्ज्ञ मार्गदर्शक- गौरव जाजू  सुयोग काळे

(म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी या बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.)

कधी ?-गुरुवार १३ फेब्रुवारी

कुठे ?-भीष्मराज बाम सभागृह, शहर पोलीस मुख्यालय, सायं. पाच वाजता