•  कामगिरी असमाधानकारक असल्याचा आयोगाचा ठपका
  •   मतदानास अवघे दोन दिवस शिल्लक  असताना कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे दोन दिवस शिल्लक असताना निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्य़ासाठी नियुक्त केलेले पोलीस निरीक्षक अजयकुमार चौधरी यांची समाधानकारक काम न केल्यावरून तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी आता योगेश चौधरी हे पोलीस निरीक्षकाची जबाबदारी सांभाळतील. या शिवाय नाशिक पश्चिम मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे यांची बदली करण्यात आली. मतदार चिठ्ठी वाटपात समाधानकारक काम नसल्यावरून ही बदली केली गेल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

sharad pawar
“…तर मोदींना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही”, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल मांडत शरद पवारांची टीका
male candidates Kalyan
कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
gopal shetty poonam mahajan absent from bjp meeting
Lok Sabha Election 2024 : बैठकीला गोपाळ शेट्टी, पूनम महाजन गैरहजर; भाजपकडून निवडणूक तयारीचा आढावा

मागील आठवडय़ात निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता. आयोगाच्या पथकाने विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा केली होती. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार चिठ्ठय़ांचे वाटप नियोजित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत भरारी पथकांनी प्रभावीपणे कारवाई केली होती. विधानसभा निवडणुकीत त्याच अनुषंगाने प्रभावीपणे कारवाईची गरज आहे. १० लाखापेक्षा अधिक रोख रक्कम अथवा मौल्यवान वस्तू चौकशीत आढळल्यास प्राप्तिकर विभागाला माहिती द्यावी, यासाठी त्या विभागाने तत्काळ प्रतिसाद पथक स्थापन करावे, आदी सूचनांचा भडिमार करण्यात आला होता.

नाशिक पश्चिम मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन गावंडे हे होते. त्यांच्या वाहनाला अपघात होऊन ते जखमी झाले. यामुळे त्यांच्या जागी महसूल प्रबोधिनीचे संजय बागडे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, मतदार चिठ्ठी वाटपात या मतदारसंघात अपेक्षित काम झाले नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. बागडे यांची बदली करून या मतदारसंघाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.