News Flash

पोलीस अकादमीत उपनिरीक्षकाची आत्महत्या

आत्महत्येमागील कारणाची स्पष्टता झालेली नाही.

येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत शनिवारी दुपारी राज्य राखीव पोलीस दलातील उपनिरीक्षकाने स्वत:च्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारणाची स्पष्टता झालेली नाही.
उत्तम मारुती धनवटे (३०, रा. धुळे) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. राज्य राखीव पोलीस दलात ते कार्यरत होते. महाराष्ट्र पोलीस अकादमीत बंदोबस्तासाठी त्यांची नियुक्ती नाशिक येथे करण्यात आली होती. दुपारी अडीचच्या सुमारास अकादमीतील आपल्या खोलीत ते आराम करत होते. या वेळी अचानक गोळी झाडल्याचा आवाज आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता हा प्रकार उघड झाला. धनवटे यांनी सव्‍‌र्हिस पिस्तुलातून स्वत:वर गोळी मारून घेतल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज आदींनी घटनास्थळी भेट दिली. आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 1:28 am

Web Title: sub inspector commits suicide in police academy
Next Stories
1 पेठ तालुक्यात पहिल्या डिजिटल स्कूलचे आज उद्घाटन
2 पित्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
3 जिल्ह्यतील धरणे रिक्त होण्याच्या मार्गावर
Just Now!
X