25 February 2021

News Flash

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ८० हजारांची मंगळसूत्रे लंपास

सोमवारी सायंकाळी पारिजातनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या मीरा अहिरराव या वनविहार कॉलनीत फेरफटका मारत होत्या.

वाहन, सोनसाखळी चोरी, रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा तोडून किमती ऐवज लंपास करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वेगवेगळ्या भागांत मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र खेचून नेण्याच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत वृद्धेला फटका मारून चोरटय़ांनी ५० हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले.

सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटनांचे सत्र सुरू असून पायी जाणाऱ्या महिलांना एकटे गाठून दुचाकीवरून येणारे चोरटे सोनसाखळी/मंगळसूत्र खेचून पसार होत आहेत. या घटना रोखण्यासाठी मध्यंतरी रस्त्यावर लोखंडी जाळ्या लावून वाहन तपासणी सुरू करण्यात आली होती. परंतु त्यात चोरटे अपवादाने सापडले. काही चोरटय़ांना जेरबंद करूनही हे प्रकार थांबलेले नाहीत.

सोमवारी सायंकाळी पारिजातनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या मीरा अहिरराव या वनविहार कॉलनीत फेरफटका मारत होत्या. दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गालात फटका मारून ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना इंदिरानगर भागात घडली. या संदर्भात वासननगर येथील उज्ज्वला नवाळे यांनी तक्रार दिली. भाजी मंडईतून खरेदी करून त्या घराकडे जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 3:31 am

Web Title: two different cases gold chain akp 94
Next Stories
1 वृद्धाचा पत्नीवर प्राणघातक हल्ला
2 महायुतीत रिपाइंची १० जागांची मागणी
3 आर्थिक फसवणूक करणाऱ्या ‘वशीकरण बाबा’ला अटक
Just Now!
X