शहर आणि ग्रामीण भागातील शाळांसमोर विविध अडचणींचा डोंगर

चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेची पहिली घंटा वाजण्याची घटिका जवळ येत असताना शहर तसेच ग्रामीण भागातील शाळांसमोर वेगवेगळ्या अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. शाळा सुरू करण्यासाठी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीचा खर्च कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळास्तरावर शिक्षकांना आर्थिक झळ सोसत ही जबाबदारी स्वीकारावी लागत असून शहरी भागात पालक कु ठल्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नसून ते ऑनलाइन शिक्षणावर ठाम आहेत. शाळा सुरू करण्याचा अट्टहास

होत असताना के वळ विशिष्ट तासिकांसाठी शाळा सुरू होणार असून अन्य विषय ऑनलाइनच शिकवले जाणार आहेत.

करोनामुळे लागू झालेली टाळेबंदी, शिथिलीकरण असे वेगवेगळे टप्पे पार के ल्यानंतर शाळेची घंटा जानेवारीत वाजणार आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत. यासाठी शासनाने काही नियमावली दिली आहे. विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी ऑक्सिमीटर, तापमापक गन, निर्जंतुकीकरणासाठी औषध आदी साधनसामग्री शाळेत आणण्यास सांगण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव कु टे या संदर्भात म्हणाले, शासनाने विद्यार्थी सुरक्षेसाठी नियमावली दिली असली तरी त्यासाठी निधीची तरतूद के ली नाही. संस्था खर्च करण्यासाठी तयार

नाही. अशा स्थितीत शिक्षक, मुख्याध्यापक निधी जमवत साधनसामग्री खरेदी करत आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायतीकडून निधी मिळविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा शाळा सुरू करण्यासाठी प्रतिसाद लाभत आहे. लवकरच शाळा सुरू होतील. परंतु मोजके च काही विषय शाळेत शिकवले जाणार असून अन्य विषय हे ऑनलाइन शिकवले जातील.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तसेच शहरातील मराठा शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे यांनी शाळा सुरू करण्याविषयी पालकांकडून प्रतिसाद नसल्याचे सांगितले. १५०० पैकी के वळ ३५० विद्यार्थ्यांची हमीपत्रे जमा झाली आहेत.

शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मुले येत असल्याने वाहतुकीची साधने नसणे, करोनाचा संसर्ग  अशी कारणे देण्यात येत आहेत. अपवाद वगळता पालक जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. ऑनलाइन शिक्षण हा पर्याय सद्यस्थितीत उत्तम असून मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे पालक ठणकावून सांगत असल्याकडे भामरे यांनी लक्ष वेधले. अशा संमिश्र वातावरणात शाळा कशा सुरू होतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

करोना चाचणी अनिवार्य

राज्य शासनाने शाळा सुरू करताना शिक्षकांना करोना चाचणी अनिवार्य  के ली आहे. जिल्ह्य़ात शहर आणि ग्रामीण भागातील माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयात पाच हजारांहून अधिक शिक्षक आहेत. यातील काही शिक्षकांची आधीच करोनाविषयक चाचणी के ली आहे. नव्या निकषानुसार चाचणी अनिवार्य असल्याने आरोग्य विभाग, शिक्षण विभागाने नियोजन के ले आहे. इंग्रजी, विज्ञान, गणित विषयाचे शिक्षक, कारकू न, मुख्याध्यापक, शिपाई यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. शाळा सुरू झाल्यावर इंग्रजी, विज्ञान, गणित या विषयांच्या तासिका प्रत्यक्ष होणार असून अन्य विषय हे ऑनलाइन शिकवले जाणार आहेत.