28 February 2021

News Flash

शहरातील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद

नागरिकांनी महापालिके ला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक : शहरातील गंगापूर धरण परिसरात करण्यात येत असलेल्या तांत्रिक कामामुळे शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत शहरातील काही भागांत विद्युतपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. परिणामी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी महापालिके ला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महानगरपालिके च्या गंगापूर धरण परिसरातील पंपिग केंद्राजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सदर ठिकाणी सद्य:स्थितीत तात्पुरती उपाययोजना करण्यात आलेली आहे. वायरची जोडणी करून त्याची चाचपणी करण्याची आवश्यकता आहे. या कामासाठी शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत महावितरण कं पनीकडून वीजपुरवठा खंडित ठेवावा लागणार आहे. परिणामी शहरात शनिवारी काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही. यामध्ये पंचवटी, नाशिकरोड, सातपूर आणि नाशिक पश्चिम या विभागांचा समावेश आहे.

नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्र मांक २४, २५, २६ व २८ येथील उंटवाडी, जगताप नगर, कालिका पार्क, इंद्रनगरी, कामटवाडे परिसर, पवननगर, आयटीआय पूल, शिवशक्ती चौक, शाहू नगर, खुटवड नगर, बंदावणे नगर, साळूंखे नगर, महालक्ष्मी नगर, डीजीपी क्र मांक दोन, मुरारी नगर, वावरे नगर, अंबड माऊली लॉन्स परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. नाशिक पूर्व विभागात वडाळा गांव, गावठाण परिसर, वडाळा रोड, जे. एम. सिटी महाविद्यालय, जयदीप नगर, साईनाथ नगर, विनयनगर परिसर, द्वारका, काठे गल्ली, जयशंकर नगर, टाकळी रोड परिसर, उपनगर पगारे मळा, प्रभाग क्र मांक २३ मधील अशोका मार्ग, हिरे नगर, टागोर नगर, डीजीपी नगर, गांधीनगर जलकुंभ १, २, ३ व ४ आणि प्रभाग क्र मांक १६ मधील आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, प्रभाग क्र मांक २३ मधील डीजीपी नगर (कल्पतरुनगर, हॅपी होम कॉलनी, बजरंगवाडी या भागात शनिवारी दूपार आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 12:06 am

Web Title: water supply will be cut off in some parts of the nashik city tomorrow zws 70
Next Stories
1 वाहतूक खर्चातील वाढीची द्राक्ष निर्यातीला झळ
2 व्यापाऱ्यांवर परवाना शुल्काचा भार 
3 जिल्ह्य़ातील धरणांमध्ये ६६ टक्के जलसाठा
Just Now!
X