Premium

नाशिक जिल्ह्यात गुटखा विरोधी अभियानात ५५६ छापे

महिनाभरात ५५६ गुन्हे दाखल करुन ७५४ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

556 raids items worth Rs 2 crore seized anti-gutkha campaign Nashik
नाशिक जिल्ह्यात गुटखा विरोधी अभियानात ५५६ छापे (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नाशिक: नाशिक ग्रामीण पोलिसांकडून गुटखा विरोधी अभियान महिनाभरापासून सुरू असून आतापर्यंत ५५६ ठिकाणी छापे टाकून दोन कोटी, १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यातील गुटखा विक्रीला पायबंद घालण्यासाठी यापूर्वी चार वेळा अभियान राबविण्यात आले आहे. सहा नोव्हेंबरपासून नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली. अभियानादरम्यान विशेष पथकाने केलेल्या कारवाईत परराज्यातील एका मालवाहतूक वाहनाव्दारे चांदवड शहरातून मुंबई-आग्रा महामार्गाने मुंबईच्या दिशेने ५० लाखांचा गुटखा नेण्यात येत असताना जप्त करण्यात आला.

हेही वाचा… नाशिक: आगीत घरातील सर्व साहित्य खाक; सिडकोतील घटना

या कारवाईत दोन संशयितांना अटक करून सुमारे ७० लाख ८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. महिनाभरात ५५६ गुन्हे दाखल करुन ७५४ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 556 raids and items worth rs 2 crore have been seized in anti gutkha campaign in nashik dvr

First published on: 02-12-2023 at 19:29 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा