नाशिक – रस्ता अपघात असो, किंवा एखादी आपत्ती असो. अशा घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो परंतु, काही जण आश्चर्यकारकरित्या बचावतात. अशावेळी काळ आला होता पण वेळ आली नव्हती… देव तारी त्याला कोण मारी, असे म्हटले जाते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सोमवारी झालेल्या अपघातात चार शिक्षकांच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल.

मुंबई-आग्रा महामार्गावरील व्हीटीसी फाट्याजवळ सोमवारी दुपारी मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरचा धक्का लागल्याने वाहन उलटले. या अपघातात चार शिक्षक जखमी झाले. त्यांना त्वरीत मदत मिळणे आवश्यक असताना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका त्यांच्या मदतीला धावून गेली. कमलाकर शिंदे (५३), अरुण भामरे (५०), माणिक सावकारे, अनिल जाधव (४८, सर्व राहणार नाशिक) हे प्राथमिक शाळेतील चार शिक्षक गंभीर जखमी झाले. हे सर्वजण इगतपुरी तालुक्यातील वाघेरे केंद्रातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत.

kalyan police marathi news, kolsewadi police marathi news
कल्याण, ठाणे, मुंबईत १४ वर्ष घरफोड्या करणारा सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
Navi Mumbai Municipality, Palm Beach Road, Traffic Jams , sion panvel highway, Due to concretization, navi mumbai news, marathi news, road construction in navi mumbai,
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल

हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पदावरून हटवले, बदली रोखण्याची राज्य सरकारची मागणी फेटाळली

शाळा सुटल्यावर वाघेरे येथून हे सर्व शिक्षक नाशिकला जात असताना अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमी व्यक्तींना नाशिक येथील खासगी दवाखान्यात दाखल केले.

हेही वाचा – जोगेश्वरीतील शिवसैनिक ठाकरे गटात, रविंद्र वायकर यांनी पक्ष सोडल्यानंतरही जोगेश्वरीत ठाकरे गटाचेच वर्चस्व ?

हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका

नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे या शिक्षकांना जीवनदान मिळाले. दोन वर्षांपूर्वी पाच जानेवारी २०२२ रोजी असाच शिक्षकांच्या वाहनाला महामार्गावर अपघात झाला होता. शिक्षकांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समजताच जखमी शिक्षकांना पाहण्यासाठी नातेवाईकांसह इतर शिक्षकांनी खासगी रुग्णालयात गर्दी केली.