चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : मराठी भाषा गौरव दिनाला उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी नाशिकला मराठी भाषा भवन होणार असल्याची घोषणा केली होती. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी परिवाराने त्यानंतर मराठी भवन निर्मितीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असताना यामध्ये लोकहितवादीच्या सहभागावर सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. दुसरीकडे मुक्त विद्यापीठ मात्र स्थितप्रज्ञाच्या भूमिकेत असून अद्याप कार्यकारी मंडळ, वरिष्ठ स्तरावर या संदर्भात चर्चाही झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

cbse, CBSE Warns Against Fake Circulars, Central Board of Secondary Education, CBSE Class 10th and 12th Results, CBSE Confirms Class 10th and 12th Results, cbse 10th and 12th, CBSE Class 10th and 12th Result 2024 dates, marathi news, cbse news, students, teacher,
सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट… निकाल कधी जाहीर होणार?
Is private property community resource supreme court reserves verdict
खासगी मालमत्ता ‘सामाजिक भौतिक संसाधने’ नव्हेत?
Vidarbha State on the occasion of Maharashtra Day Review of progress Maharashtra Day 2024
विदर्भ: अनुशेष हा शब्द गायब पण वास्तव तेच..
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?

मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात नाशिक येथील मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भवनची निर्मिती करण्याची घोषणा उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती.

या घोषणेला २० दिवसांहून अधिक काळ लोटला असला तरी राज्यस्तरावर याविषयी कोणतीही कार्यवाही पुढे झालेली नाही. मुक्त विद्यापीठही निर्णयाच्या प्रतीक्षेत असून अद्याप विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळापुढे प्रस्ताव मांडलेला नाही. अशा स्थितीत लोकहितवादी परिवाराच्या वतीने मराठी भवन नाशिकमध्ये होणार आणि या प्रक्रियेत संस्था सक्रिय राहणार, मराठी भवनाची कार्यकारिणी कशी असेल, त्याचे अधिकार याविषयी अहवाल राज्यस्तरावर देण्यात आला.

लोकहितवादी परिवाराच्या या उत्साहावर सार्वजनिक वाचनालय नाशिकचे कार्यकारी सदस्य श्रीकांत बेणी यांनी पाणी फिरविले आहे. याबाबत मुख्यमंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात, मुक्त विद्यापीठ ही स्वतंत्ररीत्या मराठी भवनची निर्मिती करू शकत असल्याने त्यासाठी आवश्यक यंत्रणा, मनुष्यबळ, निधी, संस्थेकडे आहे. त्यासाठी अन्य संस्थांची मदत घेण्याची गरज नाही. तसे करावयाचे असल्यास राज्यस्तरावरून स्वारस्यपूर्ण असलेल्या संस्थेचे प्रस्ताव मागविण्यात यावे. परंतु, त्यात लोकहितवादी सहभागी असेल तर विरोध करण्यात येईल, असे बेणी यांनी नमूद केले आहे.

नाशिकमध्ये मराठी भवन व्हावे ही इच्छा

नाशिकमध्ये मराठी भवन व्हावे ही लोकहितवादी परिवाराची इच्छा आहे. केवळ विरोधाला विरोध करू नये. शहरातल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान, सार्वजनिक वाचनालय नाशिक किंवा अन्य संस्थेने यासाठी पुढाकार घेत मराठी भवन नाशिकमध्ये स्थापन केले तरी लोकहितवादीचा विरोध नाही. मराठी भवनची संकल्पना लोकहितवादीची आहे. विरोध केल्यास हे केंद्र नाशिकमध्ये येणार नाही. मुक्त विद्यापीठ सक्षम असून मराठी भवन केंद्र ही नाशिककरांची समृध्दी असेल. ती केवळ लोकहितवादी परिवाराची नसेल. कोणीही राजकारण किंवा व्यक्तीद्वेष करू नये.

– जयप्रकाश जातेगांवकर (अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ)

मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भवन होणार आहे. लोकहितवादी परिवारासह सावानाच्या वतीने यात सहभागी होण्याचा प्रस्ताव आला आहे. मात्र कुठलीच संस्था अद्याप निश्चित केलेली नाही. विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळासमोर याबाबत प्रस्ताव मांडण्यात येईल. त्यावरील चर्चेनंतर अंतिम निर्णय होईल. राज्य शासनाकडून अद्याप सूचना आलेल्या नाहीत.  – डॉ. दिनेश बोंडे  (कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ )