scorecardresearch

Premium

एकनाथ शिंदे यांचे श्रेष्ठी दिल्लीत – राऊत 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली, त्यांचे श्रेष्ठी दिल्लीत आहेत, तर शिवसेनेचे श्रेष्ठी मुंबईत, मातोश्रीवर आहेत. मंत्रिमंडळ निश्चितीसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीला गेला नाही.

Sanjay Raut
(फोटो सौजन्य – PTI)

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली, त्यांचे श्रेष्ठी दिल्लीत आहेत, तर शिवसेनेचे श्रेष्ठी मुंबईत, मातोश्रीवर आहेत. मंत्रिमंडळ निश्चितीसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीला गेला नाही. बंडखोर गटाचे मुखवटे आपोआप गळून पडत असून पूर्वाश्रमीचे शिवसैनिक एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, असे टीकास्त्र शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी सोडले.

ठाकरे सरकार गेल्यानंतर बेळगावसह सीमावासीय मराठी जनतेवर दडपशाही वाढली आहे.  केंद्रात भाजपचे राज्य आहे. बेळगावसह सीमा भागाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. तोपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी करून आणावा, असे आव्हान त्यांनी दिले. दिल्लीत शिवसेनेच्या काही खासदारांची बैठक होऊन विचारांचे आदानप्रदान झालेले असू शकते. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार होत्या, तेव्हा शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील.

Vijay Sinha and Samrat Choudhary
भाजपाकडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे सम्राट चौधरी, विजय सिन्हा कोण आहेत?
Nitish Kumar
सकाळी राजीनामा, दुपारी पाठिंब्याचं पत्र, संध्याकाळी पुन्हा शपथ; नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी!
ajit pawar latest news in marathi, parth pawar gajanan marne marathi news
गुंड गजानन मारणे, पार्थ पवार भेटीवर अजित पवार म्हणाले, “अतिशय चुकीची…”
babasaheb patil asurlekar elected ajit pawar ncp kolhapur district president
कोल्हापूर राष्ट्रवादीत धक्कादायकघडामोडी; जिल्हाध्यक्षपदावरून ए. वाय. पाटील यांचा पत्ता कट,आसुर्लेकर नूतन अध्यक्ष

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde delhi raut shiv sena chief minister rebel shiv sainik ysh

First published on: 10-07-2022 at 00:02 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×