मानधनाविना पाहुण्यांची उपस्थिती

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या येथील के.टी. एच.एम. महाविद्यालयाच्या आवारात डिसेंबरमध्ये पार पडलेल्या संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात पाच लाख, ६३ हजार. ९३७ रुपये खर्च झाला असल्याची माहिती संमेलन समन्वयक राजू देसले यांनी दिली. या संमेलनासाठी उपस्थित कोणत्याही पाहुण्यांना मानधन देण्यात आले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.

विद्रोही साहित्य संमेलन आयोजकांनी संमेलनाचा जमा-खर्च तपशील जाहीर केला. या दोन दिवसीय संमेलनात दोन हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. संमेलनातील एकूण जमा-खर्चाचा परीक्षण अहवाल आल्यानंतर येणे बाकी असलेल्यापैकी सहा हजार २०० रुपये प्राप्त झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. रु. १३०० परीक्षण अहवाल आणि पत्रकार परिषदेचा खर्च आहे. एकूण शिल्लक ४९०० रुपये आहे. एक लाख, ८३ हजार ३७४ रुपये दोन दिवसांत प्रतिनिधीच्या जेवणावर खर्च झाले असून सर्वाधिक दोन लाख रुपयांचा खर्च मंडपावर झाला आहे. उदघाटन ते समारोपापर्यंतच्या पाहुण्यांच्या प्रवासावर ५२ हजार रुपये खर्च झाले. ध्वनी यंत्रणेसाठी २७ हजार, छापील साहित्यासाठी २४ हजार ४००, स्मृतिचिन्हांसाठी २० हजार तसेच इतर खर्च ४,४८४ रुपये झाला आहे.

सर्व जमा-खर्च अधिकृत लेखा परीक्षक संदीप नगरकर यांच्याकडून तपासून घेण्यात येऊन धर्मदाय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. बँक संमेलन खाते बंद केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. या जमा-खर्चातून पुढे आलेले निष्कर्षही संयोजकांनी मांडले. कमी खर्चात साहित्य संमेलन उत्कृष्टरीत्या शासकीय अनुदानाशिवाय जनतेच्या पैशातून आणि सहभागातून आयोजित करता येऊ शकते, हे सिद्ध झाल्याचे सांगण्यात

आले.

यानंतर १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे उदगीर येथे होणार आहे. नाशिककरांनी १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन यशस्वी केल्याने पुढील साहित्य सांस्कृतिक वाटचालीतही मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मुख्य संघटक किशोर ढमाले, संमेलनाचे मुख्य संयोजक राजू देसले, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठी साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करा

मूठभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी या मोहिमेतून ७३ हजार रुपये जमा झाले होते. देणाऱ्याला अहंकार वाटणार नाही. आणि घेणाऱ्याला न्यूनगंड

वाटणार नाही अशा प्रकारच्या सम्यक निधी संकलनातून,  छोटय़ा-मोठय़ा देणग्यांतून उर्वरित निधी प्राप्त झाला.  संमेलनस्थळ म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने कोणतेही  भाडे घेतले नाही. वस्तुरूपाने आणि ठेवारूपाने अनेकांनी मदत केली. विद्रोही साहित्य संमेलनातील ठरावाप्रमाणे ५० लाख रुपयांचे अनुदान अखिल  भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देणे बंद करावे, अशी मागणी पुन्हा  एकदा करण्यात आली.