फटाके बंदी प्रस्ताव फेटाळला ; श्रेयासाठी राजकीय चढाओढ

बुधवारी यासंबंधीचा प्रस्तावावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली.

नाशिक : प्रदूषण रोखण्यासाठी यंदाच्या दिपोत्सवात फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर ही बंदी मागे घेण्यासाठी राजकीय पातळीवर चढाओढ सुरू झाल्याचे बघायला मिळाले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप करत उपरोक्त निर्णय मागे घेण्याची सूचना केली तर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बंदीला कडाडून विरोध होऊन यासंबंधीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत फटाके वापर आणि विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव करून अधिसूचना प्रसिध्द करण्याची सूूचना विभागीय आयुक्तांनी केली होती. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना साजरी करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. दिवाळीच्या १५ दिवस आधी अशी सूचना करणे अन्यायकारक होईल. गोदामात येऊन पडलेल्या मालाचे कोटय़वधींचे नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे बंदीच्या निर्णयास फटाके विक्रेत्यांनी कडाडून विरोध दर्शविला. फटाक्यांवर बंदी घातल्यास चुकीचा संदेश जाईल हे लक्षात आल्यावर

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत राज्याच्या मुख्य सचिव व विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते. त्यावेळी ही बंदी मागे घेण्याची सूचना करण्यात आली.

बुधवारी यासंबंधीचा प्रस्तावावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. हिंदूू धर्मियांचा दिवाळी हा अतिशय महत्वाचा सण असून फटाक्यांवर अकस्मात बंदी घालणे अयोग्य असल्याचा मुद्दा सत्ताधारी भाजप, शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी मांडला. फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यास सर्वानी विरोध दर्शविल्याने महापौरांनी हा प्रस्ताव फेटाळला. फटाक्यांवरील बंदीचे सावट दूर करण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना आदींनी कंबर कसली.

गाळय़ांच्या लिलावाचा मार्ग मोकळा

फटाक्यांचा वापर आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेटाळला गेल्यामुळे फटाके विक्रीसाठी खुल्या जागांच्या (गाळे) लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. फटाक्यांवरील बंदीला सभेने मान्यता दिल्यास हे लिलाव रद्द करण्याचे प्रशासनाने सूचित केले होते. तथापि, बंदीचा प्रस्ताव फेटाळल्याने दिवाळीत फटाक्यांचा वापर व विक्री नेहमीप्रमाणे होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fire crackers ban proposal rejected in nashik municipal corporation meeting zws

Next Story
मोर्चेकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे कोंडी
ताज्या बातम्या