नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग वा तत्सम गैरप्रकारांविषयी तक्रार करण्यासाठी उपलब्ध केलेल्या सी – व्हिजिल ॲपवर पहिली ऑनलाईन तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या ६० मिनिटांच्या आत भरारी पथकाने तिचा निपटारा केला. रविशंकर मार्गावरील कुर्डुकरनगर भागात भाजपचे पक्षचिन्ह असणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. चिन्ह स्टिकर लावून झाकण्यात आले आहे.

निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सी व्हिजिल ॲपची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिक आक्षेपार्ह छायाचित्र वा चित्रफित या ॲपवर पाठवून त्याची तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारीवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. त्यासाठी १०० मिनिटांच्या आत तक्रारी निकाली काढण्याचे सूचित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात यासाठी खास भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता भंगची पहिली तक्रार या ॲपवर दाखल झाली. रवीशंकर मार्गावरील कुर्डुकरनगर भागात उभ्या असणाऱ्या वाहनावर भाजपचे कमळ हे चिन्ह व झेंडा असल्याची बाब आपण सी व्हिजिल ॲपवर तक्रारीद्वारे मांडल्याचे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले.

How many applications filed under RTE only two days left to fill the application
आरटीई अंतर्गत किती अर्ज दाखल? अर्ज भरण्यासाठी राहिले दोनच दिवस!
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा

हेही वाचा…वागदर्डीतील मृतसाठाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर; मनमाडकरांची पाणी टंचाई तीव्र होण्याची चिन्हे

ही तक्रार येताच भरारी पथकाने उपरोक्त ठिकाणी धाव घेऊन छाननी केली. तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्यावर वाहन मालकाचा शोध घेतला गेला. अग्रवाल नामक व्यक्तीच्या नावावर हे वाहन आहे. पण ती व्यक्ती घरात नव्हती. त्यांच्या कुटुंबियांना तक्रारीची कल्पना देऊन मोटारीवरील भाजपचे पक्षचिन्ह स्टिकरने झाकण्यात आले. तासाभराच्या आत ही कारवाई झाली. या बाबतची माहिती भरारी पथकाचे प्रमुख सुनील महाजन यांनी दिली. पहिलीच तक्रार तासाभराच्या आत निकाली निघाल्याने तक्रारदाराला सुखद धक्का बसला.