अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : हवामानाचा अंदाज, मुसळधार पाऊस आणि नदीपात्रातील पाण्याची वाढणारी पातळी ही पूर नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणारी माहिती वेळेत मिळण्याचा मार्ग आता जल विज्ञान प्रकल्पाच्या खोरेनिहाय आधुनिक उपकरणे बसविण्याच्या उपक्रमातून प्रशस्त होत आहे. याअंतर्गत हवामान केंद्र, पर्जन्यमापक, नदी-खोरे प्रवाह मापक, बाष्पीभवन आदीची स्वयंचलित पद्धतीने आकडेवारी संकलित करण्यात येणार आहे. तसेच त्याच क्षणी ती त्या खोऱ्यातील पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध केली जाईल. 

white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

धरणातून पाणी सोडताना हवामानाचा अंदाज, पाणलोट क्षेत्रातील पाऊस, त्यामुळे पुढील काही तासांत येणारे पाणी आदींचा विचार केला जातो. ही माहिती आजवर पारंपरिक आधारसामग्री केंद्रातील कर्मचारी संकलित करतात. अद्ययावत आकडेवारी किती वेळा मिळेल यास काही मर्यादा होती. पण, स्वयंचलित उपकरणांनी प्रत्येक तासाची माहिती उपलब्ध होऊ शकते. मुसळधार पावसात एकाच खोऱ्यातील विविध धरणांमधून एकाच वेळी पाणी सोडल्यानंतर खालील भागास बिकट स्थिती निर्माण होते. त्यामुळे पूर नियंत्रणासाठी एककालिक पूर पूर्वानुमान आणि एकात्मिक जलाशय परिचालन प्रणालीची निकड महापुराच्या अभ्यास समित्यांनी मांडली आहे. त्याच्या अंमलबजावणीत ही उपकरणे महत्त्वाची ठरतील. काही वर्षांपूर्वी खोरे समरूपण विभागाने कृष्णा-भीमा खोऱ्याचा अभ्यास करून (पंचगंगा उपखोरे वगळून) पहिल्या टप्प्यात २४९ आधुनिक उपकरणे बसविली होती. त्याची उपयोगिता सिद्ध झाल्यानंतर पंचगंगेच्या उपखोऱ्यासह कोकण, तापी, गोदावरी या सर्व खोऱ्यांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र, पर्जन्यमापक, नदी-खोरे प्रवाह व बाष्पीभवन मापक अशी सुमारे ६५० उपकरणे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. गोदावरी खोरे  वगळता इतरत्र पूर्ण झाले आहे. या माध्यमातून अद्ययावत माहिती जलदपणे मिळणार आहे. परंतु, काही कामे बाकी असल्याने काही भागांत अद्याप ती आकडेवारी मिळत नसल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात.

राज्यातील सर्वच खोऱ्यांत आधुनिक उपकरणे बसविण्याचे काम पूर्ण झाले असून गोदावरी खोऱ्यात (विदर्भ) हे काम प्रगतिपथावर आहे. संपूर्ण राज्यात ६५६ केंद्र असून आतापर्यंत ४५० हून अधिक केंद्रात उपकरणे बसवून झाली आहेत. त्याआधारे पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, नदीपात्रातून सुरू असणारा प्रवाह, धरणातील विसर्ग आदींची वास्तविक वेळेत माहिती मिळत आहे. पूर नियंत्रणासाठी या व्यवस्थेचा उपयोग होईल.

– अजय दाभाडे, अधीक्षक अभियंता, आधार सामग्री संकलन मंडळ, जलविज्ञान प्रकल्प