धुळे शहराजवळील चितोड येथे नाल्याजवळ गावठी दारु तयार करून विकणार्‍यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. पोलीस कर्मचारी विजय सोनवणे यांनी तालुका ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सुभाष भावसिंग भिल (वय ४५, रा.चितोड) आणि एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चितोडमधील नाल्याकिनारी हे दोघेही गावठी दारु बाळगताना आढळून आले. त्यांच्याकडून २० हजार ४०० रुपये किंमतीचे रसायन आणि दारु पोलिसांनी जप्त केली. दुसऱ्या घटनेत हातभट्टीवर दारु गाळताना ज्योतीबाई सुर्यवंशी आढळून आली. तिच्याकडून १७ हजार ४८० रुपये किंमतीचे रसायन व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी ललीचंद चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास