scorecardresearch

नवीन नाशिक वसंत व्याख्यानमाला अध्यक्षपदी किरण सोनार

नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ, सूर्योदय परिवार आणि लोकमान्य वाचनालय यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित नवीन नाशिक (सिडको) वसंत व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी लेखक किरण सोनार यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिक : नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ, सूर्योदय परिवार आणि लोकमान्य वाचनालय यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित नवीन नाशिक (सिडको) वसंत व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी लेखक किरण सोनार यांची निवड करण्यात आली आहे.

शिवाजी चौकातील लोकमान्य वाचनालयात १४ ते २० एप्रिल या कालावधीत व्याख्यानमाला होणार आहे. व्याख्यानमालेचे संस्थापक अध्यक्ष सावळीराम तिदमे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निवडण्यात आलेल्या उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी -जनार्दन माळी, अलका गारसे, सरचिटणीसपदी-देवराम सैंदाणे, खजिनदार -प्रकाश काळे, स्वागत समिती प्रमुख – नंदकुमार दुसानिस, विजय महाले, मधुकर पाटील आणि विजय गोसावी, नियोजन समितीपदी प्रभाकर अहिरे, वामनराव राहणे, विनोद जोशी, अनिल देवरे यांसह कार्यकारिणी सदस्यपदी सहा जणांचा समावेश आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी व्याख्यानमालेसह पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्यांनी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष किरण सोनार यांच्याशी ९८२३६१६१७५ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kiran sonar president new nashik spring lecture series lokmanya library amy

ताज्या बातम्या