नाशिक : जिल्ह्याच्या वेगवेगळय़ा भागात बिबटय़ांची संख्या वाढली असताना शहरातील इंदिरा नगर परिसरात कचऱ्याच्या गोणीत बिबटय़ाचे कातडे आढळून आले. यामुळे बिबटय़ाच्या कातडय़ाचा व्यापार होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस आणि वन विभाग यांच्याकडून संयुक्तरीत्या या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात उड्डाणपूलाजवळ असलेल्या मोकळय़ा जागेतील गवत काढण्याचे काम गुरुवारी करण्यात येत होते. या ठिकाणी महापालिका घंटागाडी कर्मचारी कचरा गोळा करत असताना त्यांना एका गोणीत बिबटय़ाचे कातडे सापडले. कर्मचाऱ्यांनी तातडीने इंदिरा नगर पोलीस तसेच वन विभागाला ही माहिती दिली. ती गोणी पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावर वन विभाग अधिकारी विवेक भदाणे यांनी कातडीची पाहणी केली. सापडलेली कातडी खरी आहे की बनावट हे तपासण्यासाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
forecast to rain along with wind in most parts of the state
गुढीपाडव्याला हलक्या सरी?

ही कातडी या ठिकाणी कशी आली, याची वन विभाग तसेच पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. याविषयी वन परिक्षेत्र अधिकारी भदाणे यांनी माहिती दिली. गोणीत आढळलेले कातडे वन विभागाने ताब्यात घेतले आहे. कातडय़ाची परिस्थिती पाहता बिबटय़ाच्या संपूर्ण शरीराची ती नाही. तीन ते चार वर्षांपूर्वीचे हे कातडे असावे. त्याची नखे आणि अन्य भाग काढून घेण्यात आला असल्याचे भदाणे यांनी नमूद केले.