वाहनांच्या हॉर्नचा गोंगाट, त्यामुळे वाढते ध्वनीप्रदूषण राज्यात ही परिस्थिती सर्वत्र दिसून येते. नाशिक देखील त्यास अपवाद नाही. वाढत्या ध्वनीप्रदुषणामुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरही याचे दुष्परिणाम होतात. या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आजपासून प्रत्येक सोमवारी ‘नो हॉर्न डे’ हा दिवस पाळण्याचे आवाहन नाशिककरांना केले आहे. या उपक्रमासाठी शहरातील काही सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेतला आहे.

वाहन चालवत असताना हॉर्नच्या बटनवर हात ठेवणे कारण नसताना हॉर्न वाजवणे काही वाहनचालकांसाठी हे नित्याचेच झाले आहे. गरज नसताना देखील काही वाहनधारकांकडून हॉर्न वाजवला जात असल्यामुळे शहराच्या ध्वनीप्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि हॉर्न वाजवून गोंगाट करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहराच्या ध्वनी प्रदूषणाच्या पातळीचा आलेखही दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर देखील होत असल्याची उदाहरणे समोर येतात.
शहरातील कमी वर्दळीचा भाग, विविध चौक, सिग्नल, गतिरोधकांजवळ काही वाहनधारकांकडून कारण नसताना हॉर्नचा वापर केला जात असल्याचे पाहावयास मिळते. हॉर्न वाजवून गोंगाट करणाऱ्या वाहनधारकांची सवय मोडावी, त्यांच्या या मानसिकतेत बदल व्हावा व ध्वनी प्रदूषणाच्या दुष्परिणामांची जाणीव सर्व सर्वसामान्यांना व्हावी या उद्देशाने आजपासून पुढील प्रत्येक सोमवारी ‘नो हॉर्न डे’ हा दिवस पाळला जाणार आहे. शहरातील ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कमी व्हावे त्यासाठी ही संकल्पना शहरात राबवली जाणार आहे. ही संकल्पना जास्तीत जास्त नाशिककरांपर्यंत पोहोचावी व शहरातील ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांचा एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. या संकल्पनेद्वारे नाशिककरांचे प्रबोधन व्हावे हा यामागील हेतू आहे.
नाशिक शहर पोलीस, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (टीसीएस), जेसीआय नाशिक, मराठा हायस्कूल कट्टा, होसला सामाजिक संस्था तसेच शहरातील विविध शाळा व महाविद्यालये, सामाजिक संस्था, मंडळे व संघटनांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विविध भागातील वर्दळीची ठिकाणे, सिग्नल, मुख्य चौक आणि रस्त्यावर या उपक्रमाच्या प्रबोधनासाठी चळवळ उभारण्यात येणार आहे.

Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
two wheeler thieves enjoy at dance bar
नागपूर: वाहन चोरायचे अन् डान्सबारमध्ये पैसे उडवायचे…