नाशिकमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून अपघातग्रस्त वृद्धाला मदत करण्याऐवजी एका चोरट्याने त्यांच्या दोन अंगठ्या चोरल्याची घटना घडली. पोलिसांनी अंगठी चोरणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे.

नाशिकमधील पंचवटीतील मालेगाव स्टँड परिसरात सुभाष भुतडा (वय ६५) हे दुकानाकडे पायी निघाले होते. यादरम्यान त्यांना एका वाहनाने पाठीमागून धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या भुतडा यांना मदत करण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. याचा फायदा घेत गर्दीतील एकाने भुतडा यांच्या बोटातील दोन अंगठ्या चोरल्या. या प्रकरणी भुतडा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत दिलीप वानखेडे (वय ३६) याला अटक केली.